मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  GG Vs DC WPL : गुजरातचा सलग चौथा पराभव, आजच्या विजयासह दिल्ली गुणतालिकेत नंबर वन

GG Vs DC WPL : गुजरातचा सलग चौथा पराभव, आजच्या विजयासह दिल्ली गुणतालिकेत नंबर वन

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 03, 2024 10:52 PM IST

Gujarat Giants vs Delhi Capitals Highlights : महिला प्रीमियर लीगमध्ये आज (३ मार्च) दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स आमने सामने होते. या सामन्यात दिल्लीने गुजरातचा २५ धावांनी पराभव केला.

Gujarat Giants vs Delhi Capitals WPL 2024
Gujarat Giants vs Delhi Capitals WPL 2024 (PTI)

Gujarat Giants vs Delhi Capitals WPL 2024 : महिला प्रीमियर लीगचा दहावा सामना आज रविवारी (३ मार्च) गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

यानंतर दिल्ली प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १६३ धावा केल्या. या प्रत्युत्तरात गुजरातचा संघ ८ बाद १३८ धावाच करू शकला.

दिल्लीच्या १६४ धावांचा पाठलाग करताना गुजरातच्या फलंदाजांनी निराशा केली. त्यांच्याकडून फक्त अॅश्ले गार्डनरने ४० धावांची खेळी केली. याशिवाय एकही फलंदाज १५ धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. कर्णधार बेथ मुनी १२, फोबी लिचफिल्ड १५ आणि वेदा कृष्णमूर्तीने १२ धावा यांनी निराशाजनक कामगिरी केली. 

दिल्ली कॅपिटल्सकडून जेस जोनासन आणि राधा यादव या फिरकी गोलंदांजी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.

आजच्या विजयासाह दिल्लीचे ४ सामन्यात तीन विजयासह ६ गुण झाले आहेत. तर मुंबई इंडियन्सचेही ४ सामन्यात तीन विजयासह ६ गुण आहेत. पण दिल्लीचा नेट रनेरट मुंबईपेक्षा चांगला आहे.

गुजरात जायंट्स अजूनही या मोसमातील पहिल्या विजयाच्या शोधात आहे. त्यांचे ४ सामन्यात ४ पराभव झाले आहेत.

दिल्ली कॅपिटल्सचा डाव

तत्पूर्वी, या सामन्यात दिल्लीने वेगवान सुरुवात केली. मेग लॅनिंग आणि शेफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी २.४ षटकात २० धावा जोडल्या. पण यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादात शेफाली बाद झाली. तिने १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १३ धावा केल्या. यानंतर कर्णधार मेग लॅनिंगने संघाचा डाव सावरला. मेग लॅनिंगने ४१ चेंडूत ५५ धावा केल्या.

तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या एलिस कॅप्सीने झटपट २७ धावा केल्या. यानंतर इतर फलंदाजांनी छोट्या-छोट्या खेळी करत संघाला १६३ धावांपर्यंत पोहोचवले.

गुजरातकडून मेघना सिंगने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर ॲश्ले गार्डनरला दोन आणि तनुजा आणि मन्नतला प्रत्येकी १ विकेट मिळाली.

IPL_Entry_Point