मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Gautam Gambhir : गौतम गंभीरचा साडेतीन वर्षांचा कार्यकाळ, ICC च्या ५ ट्रॉफी जिंकण्याची संधी, वेळापत्रक जाणून घ्या

Gautam Gambhir : गौतम गंभीरचा साडेतीन वर्षांचा कार्यकाळ, ICC च्या ५ ट्रॉफी जिंकण्याची संधी, वेळापत्रक जाणून घ्या

Jul 09, 2024 09:07 PM IST

गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये सहभागी होणार आहे. याचे आयोजन पाकिस्तानने केले आहे. मात्र, टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाईल, अशी आशा कमी आहे.

Gautam Gambhir : गौतम गंभीरचा साडेतीन वर्षांचा कार्यकाळ, ICC च्या ५ ट्रॉफी जिंकण्याची संधी, वेळापत्रक जाणून घ्या
Gautam Gambhir : गौतम गंभीरचा साडेतीन वर्षांचा कार्यकाळ, ICC च्या ५ ट्रॉफी जिंकण्याची संधी, वेळापत्रक जाणून घ्या

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. गंभीरची या पदावर साडेतीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या काळात अनेक होम आणि अवे मालिका खेळल्या जातील.

याशिवाय या काळात आयसीसीचे अनेक मोठे इव्हेंट होणार आहेत. अशा परिस्थितीत ही जबाबदारी गौतम गंभीरसाठी आव्हानांनी भरलेली असेल. गंभीरच्या आधी राहुल द्रविडने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा नवा बेंचमार्क सेट केला आहे.

राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने ३ मोठ्या आयसीसी स्पर्धा, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, आयसीसी एकदिवसीय विश्वचषक आणि टी-20 विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यातून भारताने टी-20 विश्वचषकात विजेतेपद पटकावले.

ट्रेंडिंग न्यूज

अशा परिस्थितीत, गौतम गंभीरला त्याच्या कार्यकाळात आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी किती संधी असतील ते जाणून घेऊया.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ हे पहिले आव्हान

आयसीसीने २०२४ ते २०३१ या वर्षांचे वेळापत्रक आधीच जाहीर केले आहे. तर गौतम गंभीरचा टीम इंडियाचा कार्यकाळ २०२७ च्या अखेरपर्यंत राहील. या कालावधीत, आयसीसीच्या एकूण ५ प्रमुख स्पर्धा होतील, त्यापैकी पहिली मोठी स्पर्धा म्हणजे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी.

गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये सहभागी होणार आहे. याचे आयोजन पाकिस्तानने केले आहे. मात्र, टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाईल, अशी आशा कमी आहे.

अशा परिस्थितीत भारताचे सामने यूएईमध्ये होऊ शकतात. गौतम गंभीर आपल्या कार्यकाळात टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देऊन प्रशिक्षक म्हणून चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ ची फायनल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळवला जाईल. WTC चा हा तिसरा सीझन आहे. पहिल्या दोन मोसमात भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारली होती, मात्र यात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

WTC फायनल दर २ वर्षांनी होतात. अशा परिस्थितीत प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरला रेड बॉल क्रिकेटमध्ये कडवे आव्हान असेल. शेवटच्या दोन फायनलमधील पराभवाचे दुखणे टीम इंडियाला आत्तापर्यंत सतावत असेल. अशा परिस्थितीत नवीन प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ ही आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करेल.

टी-20 विश्वचषक २०२६ भारतात होणार

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या २०२४ च्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ चॅम्पियन बनला. या स्पर्धेत टीम इंडियाने २००७ नंतर दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.

गौतम गंभीर हा २००७ टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग आहे. अशा परिस्थितीत तो आता २०२६ च्या T20 विश्वचषकात प्रशिक्षक म्हणून दुसऱ्यांदा टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

टी-20 विश्वचषक २०२६ भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करणार आहे. अशा परिस्थितीत २०२६ साली गौतम गंभीरच्या कोचिंगखाली भारतीय संघ मैदानात उतरेल तेव्हा त्यांच्यासमोर विजेतेपद राखण्याचे आव्हान असेल.

२०२७ चा वनडे विश्वचषक जिंकण्याचे आव्हान

टीम इंडिया गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२७ मध्ये सहभागी होणार आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या ३ देशांनी संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केली आहे.

भारतीय संघ २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन झाला होता. गौतम गंभीरही या संघाचा सदस्य होता. टीम इंडिया २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचला होता, पण चॅम्पियन बनू शकला नाही.

अशा स्थितीत गंभीरसमोर त्याच्या कोचिंग कारकिर्दीत चौथ्या आयसीसी ट्रॉफीचे आव्हान असणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२७ ची फायनल

गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडिया २०२७ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सहभागी होऊ शकते. WTC चा हा चौथा सीझन असेल. त्याची सुरुवात २०२५ पासून होईल. WTC च्या चौथ्या सत्रात भारतीय संघ ६ ते ७ कसोटी मालिका खेळणार आहे. अशा परिस्थितीत या काळात टीम इंडिया गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात पाचवी आयसीसी स्पर्धा खेळेल.

WhatsApp channel