पर्थमधील विजयानंतरही गंभीरला चेतेश्वर पुजारा संघात हवा होता, पण अजित आगरकर ऐकायलाच तयार नाही! वाद चव्हाट्यावर
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  पर्थमधील विजयानंतरही गंभीरला चेतेश्वर पुजारा संघात हवा होता, पण अजित आगरकर ऐकायलाच तयार नाही! वाद चव्हाट्यावर

पर्थमधील विजयानंतरही गंभीरला चेतेश्वर पुजारा संघात हवा होता, पण अजित आगरकर ऐकायलाच तयार नाही! वाद चव्हाट्यावर

Jan 01, 2025 10:31 AM IST

Gautam Gambhir : गौतम गंभीरला पुजाराचा टीम इंडियात समावेश करायचा होता, पण त्याची ही मागणी मंजूर होऊ शकली नाही, अशी माहिती समोर आली आहे.

अजित आगरकर हेड कोचचंही ऐकेना! गंभीरला चेतेश्वर पुजारा संघात हवा होता, पण मागणी मान्य झाली नाही
अजित आगरकर हेड कोचचंही ऐकेना! गंभीरला चेतेश्वर पुजारा संघात हवा होता, पण मागणी मान्य झाली नाही

Gautam Gambhir Cheteshwar Pujara : टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सध्या प्रचंड संतापलेला आहे. मेलबर्न कसोटीत संघाचा ज्या पद्धतीने पराभव झाला, त्यामुळे तो चांगलाच निराश झाला आहे. अशातच त्याने टीम इंडियाच्या खेळाडूंनाही फटकारलं आहे.

दरम्यान, आता आणखी एक महत्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोच गंभीरची एक मागणी निवडकर्त्यांनी मान्य केली नाही. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ साठी निवडकर्त्यांनी बहुतेक युवा खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला होता. महान फलंदाज चेतेश्वर पुजारासह अनेक अनुभवी खेळाडूंची नावे संघातून गायब होती.

गौतम गंभीरला पुजाराचा टीम इंडियात समावेश करायचा होता, पण त्याची ही मागणी मंजूर होऊ शकली नाही, असे या अहवालातून समोर आले आहे.

एका प्रतिष्ठिती वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, गंभीरला पुजाराला बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडियात सामील करायचं होतं, पण तसं झालं नाही. पुजाराचा संघात समावेश करावा, अशी मगणी निवडकर्त्यांनी मान्य केली नाही.

पर्थमधील मालिकेतील पहिली कसोटी जिंकल्यानंतरही पुजाराला संघात घ्या, असे गंभीर बोलला होता, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पुजाराने टीम इंडियासाठी १०० हून अधिक कसोटी खेळल्या आहेत. २०२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये त्याने टीम इंडियासाठी शेवटची टेस्ट खेळली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात पुजाराने दोन्ही डावात १४ आणि २७ धावा केल्या केल्या.

२०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत पुजाराने सर्वाधिक धावा केल्या होत्या. भारतीय फलंदाजाने १२५८ चेंडूत ५२१ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत पुजाराने २७१ धावा केल्या होत्या. 

पुजारा नसल्याने जोश हेझलवूड खूश झाला होता

पुजारा २०२४-२५ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळणार नाही, अशी बातमी आल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडने आनंद व्यक्त केला होता. हेजलवूड म्हणाला, “पुजारा येथे नसल्याचा मला आनंद आहे. तो असा आहे जो फलंदाजी करत राहतो आणि क्रिझवर बराच वेळ घालवतो.

Whats_app_banner

संबंधित बातम्या