टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी सलामीवीर गौतम गंभीरची नियुक्ती जवळपास निश्चित झाली आहे. सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविडचा करार सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकानंतर संपणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय जूनच्या शेवटच्या आठवड्यात गंभीरच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करेल अशी शक्यता आहे.
सुंत्रांच्या माहितीनुसार, गौतम गंभीरने स्वत:च्या अटींवर मुख्य प्रशिक्षक होण्यास होकार दिला आहे. त्याने बीसीसीआयसमोर काही मागण्या मांडल्या, ज्या बोर्डाने मान्य केल्या आहेत, त्यानंतरच २००७ आणि २०११ च्या विश्वचषक विजेत्या गंभीरने या हेड कोच बनण्यास होकार दिला.
विशेष म्हणजे, गौतम गंभीर सुपरस्टार कल्चरच्या विरोधात आहे. त्याच्या मते, क्रिकेट हा टीम गेम असल्याने संघाच्या यशाचे श्रेय हे सर्वांना मिळाले पाहिजे. पण, भारतात असे होताना दिसत नाही. टीम इंडियाबाबत बोलताना नेहमी धोनी, कोहली, रोहित शर्मा यांचाच उल्लेख होतो. गंभीरचा याला विरोध असून संघातील सर्व खेळाडूंना समान वागणूक मिळाली याच्या बाजूने तो आहे.
१) टीम इंडियावर पूर्ण नियंत्रण हवे
२) सपोर्ट कोचिंग स्टाफ निवडण्याचे स्वातंत्र्य
३) चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही वरिष्ठ खेळाडूंसाठी शेवटची संधी
४) भारताचा कसोटी संघ पूर्णपणे वेगळा असावा
५) २०२७ विश्वचषकासाठी रोडमॅप तयार
४२ वर्षीय गौतम गंभीरच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली कोलकाता नाइट रायडर्सने १० वर्षांचा दुष्काळ संपवला आणि २०१४ नंतर प्रथमच आणि एकूण तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. आता गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार असल्याने संघात मोठे बदल होणार हे निश्चित आहे. आक्रमक वृत्तीचा गंभीर आल्यानंतर या ४ खेळाडूंच्या करिअरला कोणत्याही एका फॉरमॅटमधून पूर्णविराम लागू शकतो.
विराट कोहली- तिन्ही फॉरमॅटमध्ये भरपूर धावा करणाऱ्या विराट कोहलीची गणना भारताच्या सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये केली जाते. २००८ मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या विराटने भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. विराटने आता फक्त कसोटी आणि एकदिवसीय फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करायला हवे, असे गौतम गंभीरचे मत आहे. टी-20 मध्ये नवीन खेळाडूंना संधी मिळणे आवश्यक आहे.
रोहित शर्मा- सध्याचा भारतीय कर्णधार रोहित शर्माने २००७ मध्ये भारताकडून पदार्पण केले. विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर त्याला कर्णधार बनवण्यात आले. सध्या तो तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व करत आहे. असो, गेल्या अनेक वर्षांपासून हिटमॅनची टी-20 फॉरमॅटमध्ये कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. अशा परिस्थितीत, गंभीरच्या आगमनाने, रोहित शर्मा यापुढे तिन्ही फॉरमॅट खेळू शकणार नाही.
रवींद्र जडेजा- गेल्या अनेक वर्षांपासून रवींद्र जडेजा कोणतीही खास कामगिरी न करता भारतीय संघात निवडला जात आहे. २०२२ T20 विश्वचषक, २०२३ एकदिवसीय विश्वचषक, सध्याचा T20 विश्वचषक, जड्डूने मागील प्रत्येक मोठ्या स्पर्धेत निराश केले आहे. हा डावखुरा फिरकी अष्टपैलू खेळाडू फक्त कसोटी खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे आणि तोही भारतीय खेळपट्ट्यांवर. अशा स्थितीत जडेजाची कारकीर्द संपुष्टात येऊ शकते.
संबंधित बातम्या