Gautam Gambhir Rohit Sharma News : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीतील पराभवामुळे भारतीय क्रिकेट संघात खळबळ उडाली आहे. या पराभवानंतर ड्रेसिंग रुममधील वादाच्या बातम्या समोर आल्या. कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात वाद झाल्याचेही बोलले जात आहे.
अशातच, सिडनीत खेळल्या जाणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी गौतम गंभीर याने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या तिखट प्रश्नांना गंभीरने अतिशय सडेतोड उत्तरे दिली.
गौतम गंभीर म्हणाला की, ड्रेसिंग रूममधील 'वादविवाद' सार्वजनिक करू नयेत. तो खेळाडूंशी 'प्रामाणिकपणे' बोलला, कारण केवळ कामगिरीच कोणत्याही खेळाडूला संघात ठेवू शकते.
ऑस्ट्रेलियातील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत गौतम गंभीर म्हणाला, "प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यातील चर्चा फक्त ड्रेसिंग रूममध्येच राहिली पाहिजे. कडक शब्द. हे फक्त चर्चा आहे, सत्य नाही. जोपर्यंत प्रामाणिक लोक ड्रेसिंग रूममध्ये आहेत." भारतीय क्रिकेट सुरक्षित हातात आहे.
फक्त एकच गोष्ट तुम्हाला ड्रेसिंग रूममध्ये ठेवू शकते आणि ती म्हणजे कामगिरी. “प्रामाणिकपणे बोलणे आणि प्रामाणिकपणा महत्वाचा आहे.”
गंभीर पुढे म्हणाला, कसोटी सामना जिंकण्याच्या रणनीतीशिवाय आपण वरिष्ठ फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्याशी काहीही बोललो नाही. तो म्हणाला, की "प्रत्येक खेळाडूला माहित आहे की त्याला कुठे सुधारणा करायची आहे. सिडनी कसोटी सामना कसा जिंकायचा हेच आपण त्यांना सांगितले आहे."
पाठीच्या दुखातपीमुळे वेगवान गोलंदाज आकाशदीप शेवटची कसोटी खेळणार नसल्याचेह गंभीरने सांगितले. मात्र, त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार हे गंभीरने सांगितले नाही. प्लेइंग इलेव्हनबाबत गंभीर म्हणाला की, विकेट पाहून निर्णय घेतला जाईल.
पत्रकार परिषदेत रोहित शर्मा सिडनी कसोटी खेळणार की नाही असा प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रशिक्षक गंभीरने सुचक प्रत्युत्तर देत म्हटले की, "मी आधीच सांगितले आहे की आम्ही उद्या खेळपट्टीची पाहणी करून निर्णय घेऊ आणि त्यानंतरच आम्ही प्लेइंग इलेव्हनबाबत निर्णय सांगू."
भारतीय संघातील मतभेदांबाबत प्रशिक्षक गंभीर म्हणाले, "या केवळ अफवा आहेत, त्यात तथ्य नाही आणि मला अशा अफवांना प्रतिसाद देण्याची गरज नाही. आम्हाला एकत्र यशाची नवीन शिखरे गाठायची आहेत."