gautam gambhir on india vs pakistan match :भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा जगातील सर्वात क्रिकेट सामना मानला जातो. भारत-पाकिस्तान सामना जेव्हा होणार असतो तेव्हा चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह असतो. या सामन्याची प्रचंड चर्चेत होते. दोन्ही क्रिकेट बोर्ड आणि ब्रॉडकास्टर्सना कोट्यवधी रुपयांचा फायदा होतो.
पण आता भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने एक मोठे वक्तव्य केले आहे. गंभीरच्या म्हणण्यानुसार, चाहत्यांना आता भारत आणि पाकिस्तान सामना पाहायला मजा येत नाही. त्यांना आता भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेटचा थरार पाहायचा असतो.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता म्हणाला तेवढा थरारक आणि मनोरंजक होत नाही. आता भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याने भारत-पाक सामन्याची जागा घेतली आहे. भारत-पाकिस्तान सामने आता एकतर्फी होताना दिसत आहेत आणि या सामन्यात भारताचे एकतर्फी वर्चस्व असते, असेही गंभीर म्हणाला.
गौतम गंभीर पुढे म्हणाला की, पाकिस्तानने भारतावर अनेकवेळा वर्चस्व गाजवले आहे, परंतु सध्या दोन्ही संघांची पातळी पाहिली तर तिन्ही फॉरमॅटमध्ये भारत पाकिस्तानपेक्षा खूपच सरस आहे.
अशात जर पाकिस्तानने भारताचा पराभव केला तर ते अपसेट झाल्यासारखे असेल. तसेच, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेटच्या बाबतीत चांगली स्पर्धा असल्याचेही गंभीर म्हणाला.
अलीकडेच एकदिवसीय विश्व २०२३ मध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानचा सहज पराभव केला. यापूर्वी भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेतही पाकिस्तानचा पराभव केला होता.
तर वर्ल्ड कपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दोनदा आमनेसामने आले होते. टीम इंडियाने साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. पण वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला.
संबंधित बातम्या