बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीत भारतीय संघ ज्या प्रकारे पराभूत झाला, त्यामुळे सर्वांचीच निराशा झाली. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या सत्रात ७ विकेट्स घेतल्या आणि १८४ धावांचा मोठा विजय नोंदवला. यासह ऑस्ट्रेलियाने केवळ मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली नाही तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधूनही भारताला जवळपास बाहेर काढले आहे.
भारताच्या अशा लाजिरवाण्या पराभवानंतर हेड कोच गौतम गंभीरने प्रत्येकाची शाळा घेतली आहे. टीम इंडियाच्या पराभवाने गंभीर खूप संतापला होता, त्याने सर्व खेळाडूंची कान उघाडणी केली.
ड्रेसिंग रुममधील भाषणादरम्यान गौतम गंभीरने ऋषभ पंत आणि विराट कोहली यांसारख्या खेळाडूंवर आपला राग काढला, ज्यांनी नैसर्गिक खेळ खेळण्याच्या नावाखाली विकेट फेकली.
गौतम गंभीरने ९ जुलै रोजी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली. गेल्या ६ महिन्यांत भारतीय संघाने अनेक चढउतार पाहिले. बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका विजय आणि त्यानंतर घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध क्लीन स्वीप.
एका मोठ्या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, गौतम गंभीरने ड्रेसिंग रूममध्ये सर्वांना कडक इशारा दिला. जो प्लॅननुसार खेळणार नसेल त्याला निरोपाचा थँक्यू म्हटले जाईल, असेही गंभीरने म्हटल्याचे समोर आले आहे.
या वृत्तपत्राच्या रिपोर्टमध्ये पुढे असेही सांगण्यात आले की की, गौतम गंभीरने गेल्या ६ महिन्यांत खेळाडूंना त्यांच्या इच्छेनुसार खेळण्याचे स्वातंत्र्य कसे दिले हे सांगितले, परंतु आता संघाला त्याच्या (गौतम गंभीर) प्रमाणे खेळावे लागेल. आता संघ कसा खेळायचा हे तो स्वतः ठरवेल.
इशारा देताना तो म्हणाला, 'जे खेळाडू ड्रेसिंग रूममधील प्लॅननुसार खेळत नाहीत त्यांना निरोपाचा थँक्यू म्हटले जाईल.
नैसर्गिक खेळाच्या नावाखाली विकेट्स भेट दिल्या जात आहेत- रिपोर्टनुसार, गौतम गंभीरने टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या 'नॅचरल गेम' बद्दलही सांगितले. संघाने केलेली योजना आणि सामन्याची परिस्थिती बाजूला ठेवून ते (खेळाडू) स्वतःच्या इच्छेनुसार खेळण्याचा प्रयत्न करत असल्याचे गंभीरने सांगितले.
मेलबर्नमधील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मानेही खेळाडू त्यांच्या इच्छेनुसार खेळतात (त्यांचा नैसर्गिक खेळ) याकडे लक्ष वेधले होते, पण आता त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे.
विराट कोहली संपूर्ण मालिकेत एकाच पद्धतीने ऑफ स्टंप बाहेरील चेंडूंना मारून बाद झाला आहे.
तर ऋषभ पंत वेगवान गोलंदाजांना विचित्र फटके मारून बाद झाला तर दुसऱ्या डावात त्याने ट्रॅव्हिस हेडसारख्या पार्ट टाइम गोलंदाजाला विकेट दिली. मेलबर्नमधील पराभवाचे सर्वात मोठे कारण ठरले. तसेच काही प्रसंगी यशस्वी जैस्वालनेही निष्काळजीपणामुळे विकेट गमावली.
दुसरीकडे, विराट कोहली आणि रोहित शर्माच्या भविष्याबद्दल बरेच काही बोलले जात आहे. सिडनी कसोटीनंतर तो निवृत्ती जाहीर करेल, असे मानले जात आहे.
या दोघांशिवाय, गेल्या वर्षी टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर रवींद्र जडेजानेही छोट्या फॉरमॅटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला होता. आता सिडनी कसोटीत काय होते आणि गौतम गंभीरच्या बोलण्याचा काही परिणाम होतो की नाही हे पाहायचे आहे.