मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  HBD MS Dhoni : अनेक कर्णधार येतील-जातील, पण धोनी होणे नाही, गंभीरचा व्हिडीओ आला चर्चेत

HBD MS Dhoni : अनेक कर्णधार येतील-जातील, पण धोनी होणे नाही, गंभीरचा व्हिडीओ आला चर्चेत

Jul 07, 2024 12:35 PM IST

गौतम गंभीर, इरफान पठाण, डीजे ब्राव्हो आणि नासिर हुसैन या खेळाडूंनी धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

HBD MS Dhoni : अनेक कर्णधार येतील-जातील, पण धोनी होणे नाही, गंभीरचा व्हिडीओ आला चर्चेत
HBD MS Dhoni : अनेक कर्णधार येतील-जातील, पण धोनी होणे नाही, गंभीरचा व्हिडीओ आला चर्चेत

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आज त्याचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. शनिवारी रात्री उशिरा माहीने केक कापला. यावेळी पत्नी साक्षी धोनीशिवाय सलमान खान आणि इतर प्रसिद्ध सेलिब्रेटी उपस्थित होते. त्याचवेळी गौतम गंभीर, इरफान पठाण, डीजे ब्राव्हो आणि नासिर हुसैन या खेळाडूंनी धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

धोनीला शुभेच्छा देताना गौतम गंभीरने सांगितले की, भारतीय क्रिकेटमध्ये अनेक कर्णधार येतील आणि जातील, पण मला वाटत नाही की कोणताही कर्णधार माहीच्या रेकॉर्ड्सी बरोबरी करू शकेल. तुम्ही परदेशात मालिका जिंकू शकता, तुम्ही कसोटी नंबर-१ बनू शकता, पण ३-३ आयसीसी ट्रॉफी सोपी गोष्ट नाही".

त्याचवेळी इरफान पठाण म्हणाला की, मला पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे माहीचे लांब केस, आम्ही बंगळुरूमध्ये सराव करत होतो, पहिल्याच चेंडूवर मी बाउन्सर टाकला, पण त्याने जबरदस्त पुल शॉट मारला. त्या शॉटवर माहीला एकच सिंगल मिळाला, पण हा फलंदाज खास असल्याचे मला जाणवले".

ट्रेंडिंग न्यूज

वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर डीजे ब्राव्हो म्हणाला की, महेंद्रसिंग धोनी हा अतिशय शांत स्वभावाचा आहे, तो भारतीय क्रिकेट आणि चेन्नई क्रिकेटसाठी सचिन तेंडुलकरच्याच श्रेणीत येतो." चेन्नई सुपर किंग्जमध्ये माहीच्या नेतृत्वाखाली खेळण्याचा अनुभव खूप छान होता. आम्ही एकमेकांच्या यशाचा आनंद लुटला".

इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन म्हणाला की, भारतासारख्या देशात क्रिकेटपटू होणे सोपे नाही, तुमच्याकडून खूप अपेक्षा असतात, मैदानावर चढ-उतार येतात. पण माहीने ज्या पद्धतीने मैदानावरील दडपण हाताळले ते कौतुकास्पद आहे, तो मैदानावर खूप शांत राहतो, त्याच्यापेक्षा शांत क्रिकेटर मी पाहिलेला नाही".

याशिवाय ब्रेट ली, आरपी सिंग, शॉन पोलॉक आणि महेला जयवर्धने यांसारख्या दिग्गज खेळाडूंनीही महेंद्रसिंह धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

WhatsApp channel