Gautam Gambhir : तू तुझं बघ ना! विराटवर बोलणाऱ्या रिकी पॉंटिंगला गुरू गंभीरनं खडसावलं, पाहा!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Gautam Gambhir : तू तुझं बघ ना! विराटवर बोलणाऱ्या रिकी पॉंटिंगला गुरू गंभीरनं खडसावलं, पाहा!

Gautam Gambhir : तू तुझं बघ ना! विराटवर बोलणाऱ्या रिकी पॉंटिंगला गुरू गंभीरनं खडसावलं, पाहा!

Nov 11, 2024 02:12 PM IST

Gautam Gambhir On Ricky Ponting : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला फटकारले. यावेळी नेमंक काय घडलं ते जाणून घ्या.

Gautam Gambhir : तू तुझ बघ ना! विराटवर बोलणाऱ्या रिकी पॉंटिंगला गुरू गंभीरनं खडसावलं, पाहा
Gautam Gambhir : तू तुझ बघ ना! विराटवर बोलणाऱ्या रिकी पॉंटिंगला गुरू गंभीरनं खडसावलं, पाहा (Agencies)

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी पत्रकार परिषद घेतली. याेवेळी गंभीर यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. मात्र, गंभीर केवळ प्रश्नांची उत्तरे देण्यापुरता मर्यादित राहिले नाहीत, तर त्यांनी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला चांगलेच सुनावले आहे.

वास्तविक, अलीकडेच रिकी पॉन्टिंग याने विराट कोहलीच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले होते. आयसीसीच्या एका कार्यक्रमात बोलताना पाँटिंग म्हणाला होता, “मी अलीकडेच विराटबद्दल एक आकडेवारी पाहिली, ज्यामध्ये असे म्हटले आहे की त्याने गेल्या पाच वर्षांत केवळ दोन (तीन) कसोटी शतके झळकावली आहेत. "हे मला योग्य वाटत नाही, पण जर ते बरोबर असेल तर, म्हणजे, ही चिंतेची बाब आहे."

पत्रकार परिषदेत गंभीरला पाँटिंगच्या या कमेंटबद्दल विचारण्यात आले, ज्यावर त्याने अतिशय सनसणीत उत्तर दिले. गंभीर म्हणाला, "पॉन्टिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध? मला वाटतं की त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटबद्दल विचार करायला हवा. मला विराट कोहली आणि रोहित शर्माची चिंता वाटत नाही."

याशिवाय पत्रकार परिषदेत गंभीर विराट कोहली आणि रोहित शर्माबद्दल म्हणाला, "सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा अजूनही कठोर परिश्रम करतात, ते अजूनही उत्साहीत आहेत, त्यांना अजूनही खूप काही साध्य करायचे आहे. आणि ते महत्त्वाचे आहे. ड्रेसिंग रूममधील खेळाडूंची भूक माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे वेळापत्रक असे आहे

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी – २२ ते २६ नोव्हेंबर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी – ०६ते १० डिसेंबर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी – १४ ते १८ डिसेंबर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी – २६ ते ३० डिसेंबर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवी कसोटी – ०३ ते ०७ जानेवारी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.

Whats_app_banner