भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका ३-० अशी जिंकली. यानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने ड्रेसिंग रूममध्ये सर्व खेळाडूंना संबोधित केले. सुपर ओव्हरपर्यंत गेलेल्या तिसऱ्या T20 मधील विजयानंतर गंभीरने या दौऱ्यावरी एकदिवसीय संघाचा भाग नसलेल्या खेळाडूंना कडक संदेश दिला.
श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाला टी-20 मालिकेसह ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. भारतीय संघाने टी-20 मालिका ३-० ने जिंकली.
बीसीसीआयने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये गौतम गंभीर म्हणतोय की, 'या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत संघाचा भाग नसलेल्या खेळाडूंना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. टी-20 मालिकेनंतर अनेक खेळाडूंना दीर्घ विश्रांती मिळणार आहे. अशा परिस्थितीत त्यांनी त्यांच्या फिटनेसवर काम करावे असे मला वाटते.
या टी-20 मालिकेनंतर तो बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत उतरणार आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपली फिटनेस पातळी वाढवावी असे मला वाटते. फिटनेससोबत कोणत्याही प्रकारची तडजोड करता कामा नये.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत धडाकेबाज खेळ करणाऱ्या काही खेळाडूंना वनडे संघातही स्थान मिळाले आहे. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या आणि रवी बिश्नोई हे खेळाडू वनडेत संघात नाहीत.
अशा स्थितीत आता त्यांचे पुनरागमन बांगलादेशविरुद्धच्या आगामी टी-२० सामन्यांत होणार आहे. त्यामुळे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी या खेळाडूंना त्यांचा फॉर्म कायम ठेवण्यास सांगितले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिलीच मालिका होती. या काळात त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने श्रीलंकेला तिन्ही सामन्यांमध्ये पराभूत करून मालिका ३-० अशी जिंकली. पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा एकतर्फी पराभव केला, मात्र तिसरा सामना सुपर ओव्हरमध्ये संपला. भारतीय संघाने ही सुपर ओव्हर सहज जिंकली.
अशा प्रकारे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर त्याच्या पहिल्या परीक्षेत पूर्णपणे यशस्वी ठरला. सूर्यकुमार यादवनेही आपल्या कर्णधारपदाखाली आपण लांब पल्ल्याच्या खेळाडू असल्याचे सिद्ध केले.
संबंधित बातम्या