Gautam Gambhir Family : गौतम गंभीरच्या कुटुंबात कोण-कोण? वडील काय करतात? पत्नी मोठ्या उद्योगपतीची लेक,जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Gautam Gambhir Family : गौतम गंभीरच्या कुटुंबात कोण-कोण? वडील काय करतात? पत्नी मोठ्या उद्योगपतीची लेक,जाणून घ्या

Gautam Gambhir Family : गौतम गंभीरच्या कुटुंबात कोण-कोण? वडील काय करतात? पत्नी मोठ्या उद्योगपतीची लेक,जाणून घ्या

Jul 10, 2024 09:34 AM IST

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यापूर्वी गंभीर २ वर्ष आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटर होता. यानंतर यावर्षी कोलकाता नाईट रायडर्सने मार्गदर्शक म्हणून आपल्या संघात खेचले.

Gautam Gambhir Family : गौतम गंभीरच्या कुटुंबात कोण-कोण? वडील काय करतात? पत्नी मोठ्या उद्योगपतीची लेक,जाणून घ्या
Gautam Gambhir Family : गौतम गंभीरच्या कुटुंबात कोण-कोण? वडील काय करतात? पत्नी मोठ्या उद्योगपतीची लेक,जाणून घ्या

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. बीसीसीआयने सोमवारी (९ जुलै) ही घोषणा केली. गंभीर श्रीलंका मालिकेत प्रथमच प्रशिक्षक म्हणून संघात सामील होणार आहे. 

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यापूर्वी गंभीर २ वर्ष आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटर होता. यानंतर यावर्षी कोलकाता नाईट रायडर्सने मार्गदर्शक म्हणून आपल्या संघात खेचले. गंभीर मेंटॉर बनताच केकेआरने १० वर्षानंतर आयपीएलचे विजेतेपद पटकावले. 

मात्र, आता गंभीर पहिल्यांदाच एखाद्या आंतरराष्ट्रीय संघाला कोचिंग करताना दिसणार आहे. गंभीरची क्रिकेट कारकीर्द चमकदार होती. त्याने भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. 

तुम्हाला गंभीरच्या क्रिकेट करिअरबाबत माहिती आहेच. पण तुम्ही त्याच्या कुटुंबाशी परिचित आहात का? चला तर मग तुम्हाला गंभीरच्या कुटुंबात कोण कोण आहे, जाणून घेऊया.

गौतम गंभीरचे वडील मोठे व्यावसायिक

गौतम गंभीरचा जन्म १४ ऑक्टोबर १९८१ रोजी नवी दिल्ली येथे एका हिंदू खत्री कुटुंबात झाला. त्याच्या वडिलांचे नाव दीपक गंभीर असून त्यांचा कापडाचा व्यवसाय आहे. त्याची आई सीमा गंभीर गृहिणी आहे. गंभीरला एक बहीण आहे, तिचे नाव एकता आहे. जी त्याच्यापेक्षा २ वर्षांनी लहान आहे.

गौतम गंभीरचे २०११ मध्ये लग्न केले

गौतम गंभीरने २८ ऑक्टोबर २०११ रोजी नताशा जैनसोबत लग्न केले. दोघांचे अरेंज्ड मॅरेज झाल्याचे बोलले जात आहे. पण काही मीडिया सूत्रांचे म्हणणे आहे की, गंभीर आणि नताशा यांचा लव्ह मॅरेज आहे. गौतम गंभीरची पत्नी नताशा एका मोठ्या उद्योगपतींची मुलगी आहे.

नताशा आणि गौतमही लग्नापूर्वी मित्र होते. गौतीची पत्नी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती गौतमसोबतचे फोटो शेअर करत असते. नताशाचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. दोघांनाही २ लाडक्या मुली आहेत. एकाचे नाव आझीन गंभीर आणि दुसऱ्याचे नाव अनैजा गंभीर आहे.

गौतम गंभीरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

४२ वर्षीय गौतम गंभीरने आपल्या कारकिर्दीत भारतासाठी ५८ कसोटी, १४७ एकदिवसीय आणि ३७ टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ४१५४ धावा, एकदिवसीय सामन्यात ५२३८ धावा आणि T20 मध्ये ९३२ धावा केल्या. 

याशिवाय गौतम गंभीर २००८ ते २०१८ या कालावधीत आयपीएलही खेळला आहे. गंभीरने १५४ आयपीएल सामन्यांमध्ये ३१ च्या सरासरीने ४२१७ धावा केल्या. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने केकेआरला २०१२ आणि २०१४ मध्ये IPL चा चॅम्पियन बनवले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या