रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी-20 विश्वचषक जिंकला. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. त्याचवेळी, या विजयानंतर दोन वेळचा विश्वविजेता गौतम गंभीर याने टीम इंडियाचे अभिनंदन केले.
राहुल द्रविडनंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आघाडीवर असलेला गौतम गंभीर म्हणाला, की 'संपूर्ण देश खूप आनंदी आहे. मला रोहित शर्मा आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन करायचे आहे.
तर विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीबद्दल गंभीर म्हणाला, 'विश्वचषक जिंकून T20 कारकीर्द संपवण्यापेक्षा चांगले काय असेल. हे दोघेही महान खेळाडू आहेत आणि त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी खूप काही केले आहे. मी त्यांचे अभिनंदन करू इच्छितो आणि त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो.
ते एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळणार आहेत. देशाच्या आणि संघाच्या यशात ते यापुढेही योगदान देत राहतील, याची मला खात्री आहे".
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी विश्वचषक जिंकताच T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. याबाबत बोलताना गौतम गंभीर म्हणाला की, “त्यांनी विश्वचषक जिंकून निवृत्ती घेतली, हे कदाचित कोणत्याही स्क्रिप्टपेक्षा चांगली गोष्ट आहे". दोन्ही खेळाडू अप्रतिम आहेत. त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी खूप काही केले आहे आणि मी त्याचे अभिनंदन करतो आणि त्याला शुभेच्छा देतो.
दरम्यान, आता विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाने टी-२० फॉरमॅटला अलविदा केला आहे. रवींद्र जडेजा आता फक्त वनडे आणि कसोटीत खेळत राहणार आहे. अशाप्रकारे टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावल्यानंतर आणि गौतम गंभीर हेड कोच होण्याआधी तीन महान भारतीय क्रिकेटपटूंनी या फॉरमॅटला अलविदा केला आहे.
टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले, पण यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेलच्या बळावर भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. विराट कोहलीने ५९ चेंडूत सर्वाधिक ७६ धावा केल्या.
त्याचवेळी भारताच्या १७६ धावांना प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून १६९ धावा करू शकला. अशा प्रकारे टीम इंडियाने ७ धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला. दक्षिण आफ्रिकेसाठी हेनरिक क्लासेनने २७ चेंडूत सर्वाधिक ५२ धावा केल्या, पण तो संघाचा पराभव टाळू शकला नाही.