ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाला ३-१ असा पराभव स्वीकारावा लागला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताचा तब्बल १० वर्षांनंतर धुव्वा उडाला. यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये फूट पडल्याची बातमी समोर आली, त्याचवेळी आता भारतीय संघातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वास्तविक, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर बीसीसीआयने टीम इंडियाची रिव्ह्यू मिटींग घेतली. यामध्ये हेड कोच गौतम गंभीर याने मोठा खुलासा केला आहे.
गंभीर म्हणाला, की खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यातील संभाषण जर स्वतःपुरतेच मर्यादित राहिले तर ते संघातील वातावरणासाठी चांगले आहे.
त्याचवेळी भारतीय संघाचा युवा फलंदाज सर्फराज खान याच्यावर मोठा आरोप करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतम गंभीरने सर्फराज खानवर ड्रेसिंग रूममधील गोष्टी बाहेर लीक केल्याचा आरोप केला आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, सर्फराज खान ड्रेसिंग रूमच्या गोष्टी मीडियाबरोबर शेअर करत होता.
खरं तर, बॉर्डर-गावस्करमधील टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. ज्यात टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये सर्व काही ठीक नाही, असे म्हटले होते.
सिडनी कसोटीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान गौतम गंभीरला दिसले तेव्हा या सर्व गोष्टी समोर आल्या, मात्र कर्णधार रोहित त्याच्यासोबत दिसला नाही.
त्याचवेळी, जेव्हा गंभीरला रोहित उद्या खेळणार का, असे विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की आम्ही टॉसच्या वेळी प्लेइंग-११ ठरवू. त्यानंतर जेव्हा रोहितला प्लेईंग-११ मध्ये जागा मिळाली नाही, तेव्हा टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण खराब असल्याची बातमी जोरात आली.
त्याचवेळी, जेव्हा गंभीरला रोहित उद्या खेळणार का, असे विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की आम्ही टॉसच्या वेळी प्लेइंग-11 ठरवू. त्यानंतर जेव्हा रोहितला प्लेईंग-11 मध्ये जागा मिळाली नाही, तेव्हा टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण खराब असल्याची बातमी जोरात आली.'
रिव्ह्यू मिटिंगमध्ये गंभीर म्हणाला का, ड्रेसिंग रूममधील चर्चा ही ड्रेसिंग रूमपुरतीच मर्यादीत राहावी.
गंभीरच्या या वक्तव्यानंतर ही चर्चा आणखी वाढली. प्रत्येकजण विचार करू लागला की ही ड्रेसिंग रूममधील बातम्या बाहेर कोण लीक करू शकते.
पण आता बीसीसीआयच्या आढावा बैठकीत गंभीरने टीम इंडियाची अंतर्गत माहिती लीक करणाऱ्या खेळाडूचे नाव उघड केले आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून मुंबईचा सरफराज खान आहे. गौतम गंभीरने सरफराजला गोष्टी लीक केल्याबद्दल फटकारले आहे. बीसीसीआयच्या आढावा बैठकीत गंभीरने सर्फराजवर आरोप केले. दरम्यान या वृत्तावर गंभीर किंवा सरफराज यांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.
संबंधित बातम्या