भारतीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंनी वर्चस्व गाजवले आहे. भारतीय क्रिकेटमध्ये काही खेळाडू आहेत, ज्यांना टीम इंडियाचे सुपरस्टार म्हणता येईल. यामध्ये सुनील गावस्कर हे ८० च्या दशकात टीम इंडियाचे सुपरस्टार होते. मग कपिल देव आले आणि भारताला विश्वविजेते बनवले. सध्या टीम इंडियाचे सुपरस्टार रोहित शर्मा आणि विराट कोहली आहेत.
दरम्यान, आता भारताचा पुढचा सुपरस्टार कोण असेल? याबाबत चर्चा सुरू आहे. या विषयावर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका कार्यक्रमात ऑस्ट्रेलियन खेळाडूंना विचारण्यात आले की भारतीय क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार कोण असेल? या वेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे मत दोन्ही खेळाडूंमध्ये विभागलेले दिसत होते. पण यात, केवळ एकाच क्रिकेटपटूचे नाव घेणारे अनेक खेळाडू होते.
सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्यानंतर सचिन तेंडुलकर ही भारतीय क्रिकेटची ओळख बनली. सचिन तेंडुलकरला केवळ भारतीय क्रिकेटचाच नाही तर जागतिक क्रिकेटचा सुपरस्टार म्हटले जात होते.
सचिननंतर धोनी आला आणि आता विराट कोहली आणि रोहित शर्मा टीम इंडियाचे सुपरस्टार बनले आहेत. आता या दोघांनीही टी-20 मधून निवृत्ती घेतली असून येत्या २-३ वर्षात ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडू शकतात.
अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेटच्या पुढच्या सुपरस्टारची म्हणजेच टीम इंडियाचा पुढचा सुपरस्टार कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे.
या दरम्यान, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मार्शन लॅबुशेन आणि मिचेल स्टार्क या ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी भारताच्या पुढील सुपरस्टारबद्दल त्यांचे मत व्यक्त केले आहे.
स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, नॅथन लायन यांनी यशस्वी जैस्वाल हा भारताचा पुढचा सुपरस्टार असेल, असे म्हटले आहे. तर कॅमेरून ग्रीन आणि ट्रॅव्हिस हेड यांनी शुभमन गिलचे नाव घेतले. याशिवाय मार्नस लॅबुशेनने गिल आणि जैस्वाल या दोघांचीही नावे घेतली.
ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दिलेली उत्तरं
स्टीव्ह स्मिथ- यशस्वी जैस्वाल
मिचेल स्टार्क- यशस्वी जैस्वाल
कॅमेरून ग्रीन-शुबमन गिल
ॲलेक्स कॅरी- यशस्वी जैस्वाल
जोश हेझलवूड- यशस्वी जैस्वाल
नॅथन लिऑन- यशस्वी जैस्वाल
मार्नस लॅबुशाग्ने- शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल
ट्रॅव्हिस हेड- शुभमन गिल