Virat Kohli News: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला काही खास कामगिरी करता आली नाही. यानंतर विराट कोहली नेटकऱ्यांच्या टीकेचा धनी ठरला. या पार्श्वभीवर इंग्लंडचे माजी क्रिकेटपटूने विराट कोहलीच्या कारककिर्दीबाबत भविष्य वाणी केली.
विराट कोहली क्रिकेटच्या सर्वात लांब फॉर्मेट टेस्ट क्रिकेटमध्ये संघर्ष करताना दिसत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकत्याच झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान विराट कोहली बऱ्याच डावात एकसारखाच आऊट झाला. तो ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर सातत्याने संयम गमावताना दिसला. विराट कोहलीचा सध्याचा फॉर्म पाहता त्याच्या कसोटी क्रिकेटमधील भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यातच इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉईडनेही कोहलीच्या कसोटी कारकिर्दीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले होते. पण त्यानंतर एकाही सामन्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. ऑफ स्टंपबाहेर जाणाऱ्या चेंडूवर विराट कोहली संघर्ष करत असल्याचे ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सतत त्याच लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केली. ऑफस्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर कोहलीने काही काळ संयम दाखवला. पण त्यानंतर त्याचा संयम तुटला आणि तो बाद झाला.
व्हिड लॉईडने टॉकस्पोर्ट्स क्रिकेटला सांगितले की,'विराट कोहलीला माहित आहे की, ऑफ स्टंपबाहेर जाणाऱ्या चेंडूवर तो अनेकदा बाद झाला आहे आणि त्याचा त्याला त्रास होईल. भारतीय संघ जेव्हा इंग्लंडदौऱ्यावर येईल, तेव्हा तो कुठे असेल, हे तुम्हाला माहित आहे. ऑफ स्टंपचे बाहेरचा चेंडू आणि स्लिप असलेल्या खेळाडूंवर नजर ठेवली जाणार आहे. वयाच्या ३६व्या वर्षी त्याला काय करायला हवे, हे त्याला ठाऊक आहे. विराट कोहली महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. विराट कोहलीच्या प्रदर्शनात प्रशिक्षक गौतम गंभीरची भूमिका मोठी असेल. पण विराट वेळ गमावला आहे, त्याची वेळ संपली आहे.'
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका २२ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादव टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. या मालिकेतून शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्याच वेळी, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील पराभवानंतर, बीसीसीआय खेळाडूंबद्दल थोडे कठोर आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही सर्व खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळले पाहिजे, असे म्हटले आहे. त्याच वेळी, रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दिल्लीच्या संभाव्य संघात विराट कोहली आणि ऋषभ पंत यांची नावे देखील समाविष्ट आहेत. परंतु, कोहलीने अद्याप रणजीमध्ये खेळण्याबाबत डीडीसीएला कोणतीही माहिती दिलेली नाही.
संबंधित बातम्या