वीरेंद्र सेहवाग हा भारतातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तो त्याच्या काळातील सर्वात आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो आणि त्याने अनेक गोलंदाजांची धुलाई केली आहे.
मात्र, आता सेहवाग क्रिकेटमुळे नाही तर वैयक्तीक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सेहवागबाबत अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.
खरं तर, सेहवाग आपला २१ वर्षांचा संसार मोडणार असल्याचे बोलले जात आहे. सेहवाग आणि त्याची पत्नी एकमेकांपासून विभक्त होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अहलावत यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे आणि एक वर्षापासून वेगळे राहत आहेत.
सध्या क्रिकेट जगतात घटस्फोटाच्या बातम्या चर्चेत आहे. गेल्या वर्षी हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांचा घटस्फोट झाला. त्याचबरोबर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या अफवाही समोर आल्या आहेत.
अशा परिस्थितीत आता माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती यांच्याबाबतही ते वेगळे होत असल्याच्या बातम्या येत आहेत. या जोडप्याच्या लग्नाला २१ वर्षे झाली असून त्यांना दोन मुले आहेत.
वीरेंद्र सेहवागने त्याचे कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्य मीडियापासून दूर ठेवले आहे. सेहवाग कधीतरी सणासुदीला पत्नीसोबतचे फोटो शेअर करतो. पण गेल्या वर्षी दिवाळी २०२४ ला वीरूने त्याची आई आणि मोठा मुलगा आर्यवीरसोबत एक फोटो शेअर केला होता.
पण, त्याची पत्नी आणि धाकटा मुलगा वेदांत कुठेच दिसत नव्हते. तेव्हापासून त्यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. तसेच, सेहवागने आपल्या पत्नीला इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्याचेही समोर आले आहे.
सेहवागची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या स्टोरीसारखीच आहे. सेहवाग आणि आरतीची लव्हस्टोरी ही त्यांच्या लहानपणापासून सुरू झाली होती. दोघांची पहिली भेट १९८० च्या दशकात झाली जेव्हा आरतीच्या आत्याने सेहवागच्या चुलत भावाशी लग्न केले, यामुळे दोन्ही कुटुंब नात्यात बांधले गेले.
अशा स्थितीत आरतीची आत्या आणि सेहवाग यांच्यात भावजय आणि वहिनीचे नाते निर्माण झाले.
यानंतर वीरेंद्र सेहवागच्या मनात आरतीबद्दल भावना निर्माण होऊ लागल्या आणि त्यानंतर त्याने आरतीला प्रपोज केले. आरतीने हे प्रपोजल स्वीकारले. या जोडप्याने २२ एप्रिल २००४ रोजी वर्षांनी लग्न केले.
दरम्यान, या लग्नाला घरच्यांची मागणी मिळावी, यासाठी सेहवागला खूप मेहनत घ्यावी लागली. जवळपास तीन वर्षांच्या मेहनतीनंतर दोघांनीही एकमेकांच्या कुटुंबाला पटवून दिलं. त्यानंतर माजी केंद्रीय कायदा मंत्री आणि नंतर भारताचे अर्थमंत्री बनलेल्या अरुण जेटली यांच्या निवासस्थानी हा विवाह पार पडला.
संबंधित बातम्या