भारतीय संघ आपल्या शेवटच्या ग्रुप स्टेज मॅचसाठी न्यूयॉर्कहून मियामीला पोहोचला आहे. येथे भारताचा उद्या म्हणजेच १५ जून रोजी सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे कॅनडाशी सामना होईल. या सामन्यापूर्वी फ्लोरिडामध्ये अचानक जोरदार पाऊस झाला असून पूर आला आहे. जोरदार वादळामुळे आणि पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
शनिवारी भारत आणि कॅनडा सामना होणार आहे. पण शनिवारी फ्लोरिडामध्ये पावसाची ५० टक्के शक्यता आहे. अ गटाचे पुढील ३ सामने मियामीपासून अवघ्या ३० मैलांवर असलेल्या लॉडरहिल, फ्लोरिडा येथे होणार आहेत.
भारत-कॅनडा सामन्यापूर्वी अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात सामना होणार आहे. हा सामना शुक्रवारी होणार आहे. मात्र पावसामुळे तो रद्द होऊ शकतो. यासोबतच भारत आणि कॅनडा यांच्यातील सामनाही रद्द होऊ शकतो. फ्लोरिडाच्या मियामीमध्ये पुरासारखी परिस्थिती आहे. येथून लॉडरहिल तासाभराच्या अंतरावर आहे. त्यामुळे या भागावरही परिणाम होऊ शकतो.
लॉडरहिलमध्ये खराब हवामान आहे. कॅनडाविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया येथे पोहोचली आहे. मात्र खराब हवामानामुळे भारतीय संघ शुक्रवारी सराव सत्रात सहभागी होऊ शकला नाही. ते रद्द करावे लागले.
दरम्यान, लागोपाठ ३ सामन्यांमध्ये ३ विजय मिळवून, भारताने आधीच सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. सुपर-८ चे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार आहेत.
कॅनडाविरुद्धचा सामना रद्द झाल्यास भारताला एक गुण मिळेल आणि ते ७ गुणांसह अव्वल स्थानावर राहतील. कॅनडा वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. त्यांनी ३ सामने खेळले आहेत आणि १ जिंकला आहे. त्यांचे २ गुण आहेत.
भारत टी-20 विश्वचषकाचा संपूर्ण: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
कॅनडा टी-20 विश्वचषकाचा संपूर्ण संघ : साद बिन जफर (कर्णधार), आरोन जॉन्सन, डिलन हेलिगर, दिलप्रीत बाजवा, ऋषीव जोशी, जेरेमी गॉर्डन, जुनैद सिद्दीकी, कलीम सना, कंवरपाल तथगुर, नवनीत धालीवाल, निकोलस किर्तन, परगट सिंग, रवींद्रपाल सिंग, रवींद्रपाल सिंग. आणि श्रेयस मोव्वा (यष्टीरक्षक).
संबंधित बातम्या