ड्रग्ज घेतोस का? तमीम इक्बाल आणि ॲलेक्स हेल्स यांच्यातील वाद एवढ्या टोकाला का गेला? नेमकं काय घडलं? पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  ड्रग्ज घेतोस का? तमीम इक्बाल आणि ॲलेक्स हेल्स यांच्यातील वाद एवढ्या टोकाला का गेला? नेमकं काय घडलं? पाहा

ड्रग्ज घेतोस का? तमीम इक्बाल आणि ॲलेक्स हेल्स यांच्यातील वाद एवढ्या टोकाला का गेला? नेमकं काय घडलं? पाहा

Jan 10, 2025 08:37 PM IST

Tamim Iqbal And Alex Hales Fight : बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये मोठा वाद झाला आहे. तमिम इक्बाल आणि ॲलेक्स हेल्स यांच्यात हा वाद झाला.

ड्रग्ज घेतोस का? तमीम इक्बाल आणि ॲलेक्स हेल्स यांच्यातील वाद एवढ्या टोकाला का गेला? नेमकं काय घडलं? पाहा
ड्रग्ज घेतोस का? तमीम इक्बाल आणि ॲलेक्स हेल्स यांच्यातील वाद एवढ्या टोकाला का गेला? नेमकं काय घडलं? पाहा

क्रिकेटच्या मैदानावरील एक वाद सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. हा वाद बांगलादेश प्रीमियर लीगच्या एका सामन्यातील आहे. या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या भांडणाची बरीच चर्चा रंगली आहे. या भांडणात बांगलादेशी क्रिकेटर तमीम इक्बाल याने सर्व मर्यादा ओलांडल्याचे दिसत आहे .

वास्तविक, ही संपूर्ण घटना बांगलादेश प्रीमियर लीगच्या एका सामन्यात घडली जेव्हा रंगपूर रायडर्सचा सलामीवीर फलंदाज ॲलेक्स हेल्स हा फॉर्च्युन बरीशाल संघाचा कर्णधार तमीम इक्बाल याच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी गेला होता. या सामन्यात रंगपूर रायडर्स संघाने रोमहर्षक विजय मिळवला होता.

या पराभवानंतर बरीशालचा कर्णधार तमीम इक्बाल चांगलाच निराश झाला. यावेळी ॲलेक्स हेल्स त्याच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी गेला असता वाद निर्माण झाला.

तमिमने हेल्सवर वैयक्तिक टिप्पणी केली

रिपोर्ट्सनुसार, फॉर्च्युन बारिशालचा कर्णधार तमीम इक्बाल इंग्लंडच्या खेळाडूला म्हणाला, 'तू असं का वागतोय? तुला काही बोलायचे असेल तर माझ्यासमोर बोल. तमिमच्या या प्रश्नाने ॲलेक्स हेल्स हाही हैराण झाला. प्रकरण इतके वाढले की सहकारी खेळाडूंना दोघांना वेगळे करण्यासाठी यावे लागले.

या घटनेनंतर ॲलेक्स हेल्सने तमीमवर वैयक्तिक कमेंट केल्याचा आरोप केला. तु अजूनही ड्रग्ज घेतोस का अशा प्रश्न तमीने आपल्याला केला होता, असे हेल्सने सांगितले.

२०१९ मध्ये ॲलेक्स हेल्सवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप झाला होता, त्यामुळे त्याच्यावर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बंदी घातली होती. या प्रकरणावरून तमिमने हेल्सवर कमेंट केली होती.

ॲलेक्स हेल्सने काय सांगितले?

ॲलेक्स हेल्सने मुलाखतीत या घटनेबाबत सविस्तर सांगितले की, 'मला माहित नाही, तमीम कोणत्या गोष्टीवरून नाराज होता... आम्ही हस्तांदोलन केले आणि तो म्हणाला, की तुला काही बोलायचे असेल तर माझ्यासमोर बोल. मी यावर काही नाही असे सांगितले होते आणि शांत झाले. पण यानंतर तो खूप पर्सनल झाला, जे योग्य नव्हते. खेळाव्यतिरिक्त मैदानावर बाहेरच्या गोष्टी आणू नयेत.

या सामन्यात तमीम इक्बालच्या कर्णधार असलेल्या फॉर्च्युन बरीशालने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावत १९७ धावा केल्या, मात्र प्रत्युत्तरात रंगपूर रायडर्सनेही दमदार खेळ दाखवला आणि बाजी मारली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या