Viral Video : कॅच घेतल्याचं सेलिब्रेशन करताना खेळाडूकडून नकळत जे घडलं, ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Viral Video : कॅच घेतल्याचं सेलिब्रेशन करताना खेळाडूकडून नकळत जे घडलं, ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही!

Viral Video : कॅच घेतल्याचं सेलिब्रेशन करताना खेळाडूकडून नकळत जे घडलं, ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही!

Jan 08, 2025 12:05 PM IST

Cricket Viral Video: युरोपियन क्रिकेट सीरिजमधील एका सामन्यात खेळाडूने केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओ: कॅच घेतल्यानंतर खेळाडूचं सेलिब्रेशन पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही!
व्हायरल व्हिडिओ: कॅच घेतल्यानंतर खेळाडूचं सेलिब्रेशन पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही!

Funny Video: क्रिकेट हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. परंतु, क्रिकेटमध्ये अनेकदा अशा गंमतीशीर गोष्टी घडतात, ज्या अनेकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात एका खेळाडूनं झेल पकडल्यानंतर सेलिब्रेशन करताना आपल्याच खेळाडूला जखमी केले. ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा मैदानातील प्रेक्षकांना हसू की रडू असे झाले. या सामन्यात नेमके असे काय घडले? हे जाणून घेऊयात.

युरोपियन क्रिकेटच्या अधिकृत सोशल मीडिया खात्याद्वारे एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ गेल्या वर्षी जूनमध्ये खेळण्यात आलेल्या बोहेमियन सीसी विरुद्ध प्राग सीसी सामन्यातील आहे. या सामन्यात प्राग सीसीचा रविकुमार सोलंकी सीमारेषेवर उत्कृष्ट असा झेल पकडतो. परंतु,सेलिब्रेशन करताना त्याचा हात सहकारी खेळाडूच्या नाजूक जागेवर लागतो. त्यानंतर तो खेळाडू जमीनीवर बसतो, हे पाहून प्राग सीसी संघातील सर्व खेळांडूसह मैदानातील प्रेक्षकही हसू लागतात, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी जून महिन्यात बोहेमियन सीसी आणि प्राग सीसी यांच्यात युरोपियन क्रिकेट सिरीजमधील ४० सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना प्राग सीसीने बोहेमियन सीसी संघासमोर १० षटकांत १६३ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना बोहेमियन सीसी संघाचा सलामावीर साजिब भुईया सुदेश विक्रमसेकराच्या चेंडूवर मोठा फटका मारला. त्यावेळी सीमारेषेवर उभा असलेल्या सोलंकीने कोणतीही चूक न करता झेल पकडला. यानंतर सोलंकी जोरात जमीनीवर बॉल आदळतो. मात्र, त्यावेळी त्याच्या शेजारी असलेल्या सहकारी खेळाडूच्या नाजूक जागेवर नकळत त्याचा हात लागतो. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. यानंतर खेळाडूंसह कॉमेंटेटर देखील हसू लागतात. हा व्हिडिओ युरोपियन क्रिकेटने पुन्हा एकदा आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

प्राग सीसीचा ३९ धावांनी विजय

या सामन्यात सलामीवीर शरण रामकृष्णनच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर प्राग सीसी संघाने निर्धारित १० षटकांत बोहेमियनसमोर १६२ धावांचे लक्ष्य ठेवले. प्राग सीसीकडून शरण रामकृष्णन याने अवघ्या २७ चेंडूत ७१ धावा केल्या. तर, त्याचा जोडीदार सबावून डेविझी याने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या खेळीत चार चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. या लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या बोहेमियन संघाला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यांना हा सामना ३९ धावांनी गमावला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या