भारतात क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. अनेक जणांसाठी हा केवळ खेळ नसून धर्म आहे. पण भारतीय क्रिकेटचा जन्मदाता कोण आहे? हे तुम्हाला माहीत आहे का?
रणजीत सिंग यांना भारतीय क्रिकेटचा जन्मदाता म्हटले जाते, तेच भारताचे पहिले क्रिकेटपटू होते. भारताच्या पहिल्या क्रिकेटपटूचा जन्म १० सप्टेंबर १८७२ रोजी झाला. रणजीत सिंग यांनी क्रिकेट जगताच्या इतिहासात आपले नाव नोंदवले.
रणजीत सिंग यांनी इंग्लंडकडून क्रिकेट खेळले. ब्रिटिश राजवटीत त्यांनी इंग्लंडच्या संघात एक वेगळे आणि मानाचे स्थान निर्माण केले होते. त्यांनी ब्रिटिशांना अनेक सामने जिंकून दिले.
रणजीत सिंग यांचे १९३३ साली निधन झाले, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ १९३४ मध्ये भारतात रणजी ट्रॉफी सुरू करण्यात आली.
सुरुवातीच्या काळात क्रिकेट फक्त इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळले जायचे. अशा स्थितीत या भारतीय वंशाच्या खेळाडूला इंग्लंड संघात स्थान मिळेल की नाही, अशी अपेक्षाही नव्हती.
रणजीत सिंग यांनी ३०७ प्रथम श्रेणी सामने खेळले. या सामन्यांमध्ये ५६ च्या सरासरीने २४६९२ धावा केल्या. ज्यामध्ये ७२ शतके आणि १०९ अर्धशतकांचा समावेश आहे. रणजीत सलग ४ वर्षे कर्णधार राहिले.
क्रिकेटपटू रणजीत सिंग यांचा जन्म १० सप्टेंबर १८७२ रोजी नवानगर राज्यातील सदोदर गावात एका जडेजा राजपूत कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जीवन सिंह आणि आजोबांचे नाव झलम सिंग होते, ते नवानगरचे महाराज जाम साहेब विभाजी जडेजा यांच्या घराण्यातील होते.
रणजित सिंग यांना क्रिकेटमध्ये विशेष रस नव्हता, त्यांना लहानपणापासूनच टेनिसपटू व्हायचे होते. पण जेव्हा ते शिक्षणासाठी इंग्लंडले गेले तेव्हा त्यांना क्रिकेटची आवड निर्माण झाली. इंग्लंडमधील लोकांची क्रिकेटची क्रेझ पाहून रणजीत यांनीही क्रिकेटर होण्याचा निर्णय घेतला.
रणजीत सिंग यांची इंग्लंड संघात निवड झाली तेव्हा लॉर्ड हरिसने विरोध केला होता. रणजीत यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला नसल्यामुळे तो इंग्लंडकडून खेळू शकत नाही, असे त्याचे म्हणणे होते. पण १८९६ मध्ये रणजीत सिंग यांची इंग्लंड संघात निवड झाली.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत रणजीत सिंगल यांना संधी मिळाली. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात रणजीत यांनी इंग्लंडसाठी ६२ धावा केल्या होत्या. इंग्लंडचे खेळाडू एकामागून एक पॅव्हेलियनमध्ये परतत असताना रणजीत सिंग यांनी संपूर्ण संयमी खेळी खेळली होती.
संबंधित बातम्या