Fastest Century In T20 : ख्रिस गेल ते डिव्हिलियर्स सर्वांचे विक्रम मोडले, २७ चेंडूत शतक केलं, इतके षटकार ठोकले
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Fastest Century In T20 : ख्रिस गेल ते डिव्हिलियर्स सर्वांचे विक्रम मोडले, २७ चेंडूत शतक केलं, इतके षटकार ठोकले

Fastest Century In T20 : ख्रिस गेल ते डिव्हिलियर्स सर्वांचे विक्रम मोडले, २७ चेंडूत शतक केलं, इतके षटकार ठोकले

Published Jun 17, 2024 09:02 PM IST

Sahil Chauhan 27 Balls Century : साहिल चौहानने सायप्रसविरुद्ध टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अवघ्या २७ चेंडूत शतक झळकावले. साहिलने आधी १४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर पुढच्या १३ चेंडूत शतक झळकावले.

Sahil Chauhan 27 Balls Century : ख्रिस गेल ते डिव्हिलियर्स सर्वांचे विक्रम मोडले, २७ चेंडूत शतक केलं, इतके षटकार ठोकले
Sahil Chauhan 27 Balls Century : ख्रिस गेल ते डिव्हिलियर्स सर्वांचे विक्रम मोडले, २७ चेंडूत शतक केलं, इतके षटकार ठोकले

सध्या वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कप खेळला जात आहे. या दरम्यान, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम मोडला गेला आहे. नामिबियाच्या जॉन निकोल लॉफ्टी-ईटनने या वर्षी फेब्रुवारीमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ३३ चेंडूत शतक झळकावले होते.

पण आता इस्टोनियाच्या साहिल चौहानने त्याच्यापेक्षा ६ चेंडू कमी खेळून शतक झळकावले आहे. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच कोणत्याही व्यावसायिक क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक आहे.

T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात २७ चेंडूत शतक

साहिल चौहानने सायप्रसविरुद्ध टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अवघ्या २७ चेंडूत शतक झळकावले. साहिलने आधी १४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर पुढच्या १३ चेंडूत शतक झळकावले.

१९२ धावांचा पाठलाग करताना इस्टोनियाने ९ धावांत दोन विकेट गमावल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने षटकार मारून आपले खाते उघडले. यानंतर पुढच्या दोन चेंडूंवर १० धावा झाल्या. येथून त्याने मागे वळून पाहिले नाही.

साहिलने ४१ चेंडूत १४४ धावा केल्या

साहिल चौहानने ४१ चेंडूत १४४ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत १८ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. एका T20 आंतरराष्ट्रीय डावात सर्वाधिक १८ षटकार मारण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

विशेष म्हणजे आजच झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात तो शुन्यावर बाद झाला होता. पण दुसऱ्या सामन्यात त्याने गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आणि विश्वविक्रम केला. १३व्या षटकातच त्यांच्या संघाने १९४ धावा केल्या आणि सायप्रसविरुद्धचा सामना ६ विकेटने जिंकला.

आंतरराष्ट्रीय T20 च्या एका डावात सर्वाधिक षटकार

१८ - साहिल चौहान (एस्टोनिया)

१६ - हजरतुल्ला झाझई (अफगाणिस्तान)

१६ - फिन ऍलन (न्यूझीलंड)

१५ - झीशान कुकीखेल (हंगेरी)

गेल ते डिव्हिलियर्स सर्वांचे विक्रम मोडले

यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम एबी डिव्हिलियर्सच्या नावावर होता. त्याने ३१ चेंडूत शतक झळकावले होते. ख्रिस गेलने T20 मध्ये ३० चेंडूत शतक पूर्ण केले होते.

व्यावसायिक क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या जॅक फ्रेजर मॅकगर्कच्या नावावर होता. गेल्या वर्षी तेथील देशांतर्गत स्पर्धेत त्याने २९ चेंडूत शतक झळकावले होते. पण आता साहिल चौहानने हे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या