IPL Viral Video : मुंबई-गुजरात सामन्यात राडा, चाहत्यांमध्ये तुफान हाणामारी, कारण…-fans fighting during gujarat titans vs mumbai indians match ipl 2024 watch video hardik pandya rohit sharma ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL Viral Video : मुंबई-गुजरात सामन्यात राडा, चाहत्यांमध्ये तुफान हाणामारी, कारण…

IPL Viral Video : मुंबई-गुजरात सामन्यात राडा, चाहत्यांमध्ये तुफान हाणामारी, कारण…

Mar 25, 2024 04:05 PM IST

fans fighting during GT vs MI match : यंदाच्या आयपीएलआधी हार्दिक पांड्या गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये परतला आणि थेट कर्णधार झाला. यामुळे रोहित शर्माचे चाहते चांगलेच नाराज आहेत आणि या चाहत्यांच्या टार्गेटवर हार्दिक पांड्या आहे.

fans fighting during gujarat titans vs mumbai indians match मुंबई-गुजरात सामन्यात राडा, चाहत्यांमध्ये तुफान हाणामारी, कारण…
fans fighting during gujarat titans vs mumbai indians match मुंबई-गुजरात सामन्यात राडा, चाहत्यांमध्ये तुफान हाणामारी, कारण…

Mumbai Indians vs Gujarat Titans : IPL २०२४ चा पाचवा सामना रविवारी (२४ मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. कारण हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स पहिल्यांदाच मैदानात उतरली होती.

पण या सामन्यादरम्यान एक अतिशय वाईट घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियवर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओत प्रेक्षकांमधील काही चाहते एका व्यक्तीला मारहाण करत असल्याचे दिसत आहे.

आयपीएल सामन्याच्या मध्यावर ही भांडणे का झाली? याचे कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही. मात्र चाहत्यांच्या या संघर्षामुळे स्टेडियमचे वातावरण बिघडले होते.

हा व्हिडिओ झपाट्याने पसरला, मात्र चाहत्यांमध्ये झालेल्या भांडणाचे कारण समोर आलेले नाही.

यंदाच्या आयपीएलआधी हार्दिक पांड्या गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये परतला आणि थेट कर्णधार झाला. यामुळे रोहित शर्माचे चाहते चांगलेच नाराज आहेत आणि या चाहत्यांच्या टार्गेटवर हार्दिक पांड्या आहे.

टॉसवेळी जेव्हा हार्दिक मैदानात आला तेव्हा संपूर्ण रोहित-रोहितच्या घोषणा देत होते. यावेळी इंग्लिश समालोचक केविन पीटरसन म्हणाला की, भारतातील क्रिकेटपटूला अशाप्रकारे ट्रोल करण्याची पहिलीच घटना मी पाहिली आहे.

मुंबई इंडियन्सने हंगामापूर्वी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या कर्णधार असेल असे जाहीर केले होते. या निर्णयाने मुंबई इंडियन्सचे चाहते अजिबात खूश दिसत नाहीत. यामुळेच हार्दिक पांड्या टीकेच्या भोवऱ्यात राहिला आणि चांगली कामगिरी करण्यातही तो यशस्वी झाला नाही. मुंबई इंडियन्स संघाला १६९ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करता आला नाही.

गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी गमावून १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघ २० षटकांत ९ गडी गमावून १६२ धावाच करू शकला. यासह, मुंबई इंडियन्सने स्पर्धेतील आपला पहिला सामना गमावण्याचा १२ वर्षांचा प्रदीर्घ सिलसिला कायम ठेवला.