टीम इंडियाचा अनुभवी क्रिकेटपटू विराट कोहली याची लोकप्रियता कोणापासून लपलेली नाही. विराट कोहलीची गणना जागतिक क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय खेळाडूंमध्ये केली जाते. या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी चाहते कोणताही अडथळा पार करण्यास तयार असतात.
अशीच एक घटना ऑस्ट्रेलियात पाहायला मिळाली आहे. सध्या विराट कोहली आणि इतर भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. टीम इंडिया पहिल्या कसोटीसाठी पर्थमध्ये सराव करत आहेत. येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळला जाणार आहे.
अशातच आता, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये विराट कोहली नेट प्रॅक्टिस करत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोहलीची एक झलक पाहणयासाठी चाहते चक्क झाडावर चढले, जेणेकरून त्यांना विराट कोहलीला पाहता येईल.
फॉक्स क्रिकेटने विराट कोहलीच्या नेट प्रॅक्टिसचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली आणि त्याला पाहण्यासाठी झालेली चाहत्यांची दाखवण्यात आली आहे. तसेच, व्हिडिओ कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, काही चाहते विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी सर्व अडथळे पार केले आहेत.
आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.
दरम्यान, आज विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी ऑस्ट्रेलियात बालदिन साजरा केला. दोघांनीही या प्रसंगाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा मुलांसोबत बालदिन साजरा करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये हा फोटो पोस्ट केला आहे.
तसेच, अनुष्काने फोटो कॅप्शनमध्ये लिहिले आहे,की बालदिन मेनू - स्माईल, गिगल आणि मिलेट नूडल्स...
विराट कोहली आणि इतर भारतीय खेळाडू बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २२ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. उभय संघांमधली पहिली कसोटी पर्थ येथे खेळवली जाणार आहे.