Watch : मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनसोबत वाईट वागणूक, हार्दिक दिसताच चाहत्यांनी दिल्या छपरी-छपरीच्या घोषणा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Watch : मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनसोबत वाईट वागणूक, हार्दिक दिसताच चाहत्यांनी दिल्या छपरी-छपरीच्या घोषणा

Watch : मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनसोबत वाईट वागणूक, हार्दिक दिसताच चाहत्यांनी दिल्या छपरी-छपरीच्या घोषणा

Mar 25, 2024 05:16 PM IST

Fans Trolled Hardik Pnadya IPL 2024 : टॉसवेळी जेव्हा हार्दिक मैदानात आला तेव्हा संपूर्ण रोहित-रोहितच्या घोषणा देत होते. यावेळी इंग्लिश समालोचक केविन पीटरसन म्हणाला की, भारतातील क्रिकेटपटूला अशाप्रकारे ट्रोल करण्याची पहिलीच घटना मी पाहिली आहे.

fan chants chapri after seeing mumbai indians captain : हार्दिक पांड्यासोबत वाईट वागणूक, चाहत्यांनी संपूर्ण सामन्यात दिल्या छपरी-छपरीच्या घोषणा
fan chants chapri after seeing mumbai indians captain : हार्दिक पांड्यासोबत वाईट वागणूक, चाहत्यांनी संपूर्ण सामन्यात दिल्या छपरी-छपरीच्या घोषणा (AFP)

Fans Chants Chapri to Hardik Pandya : आयपीएल २०२४ (IPL 2024) मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवाने झाली. त्यांना गुजरात टायटन्सने अवघ्या ६ धावांनी पराभूत केले. मुंबई इंडियन्सला शेवटच्या ५ षटकांमध्ये ४२ धावांची गरज होती, मात्र मुंबईच्या फलंदाजांना शेवटच्या षटकांमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही आणि त्यांना ६ कमी पडल्या.

विशेष म्हणजे, या सामन्यादरम्यान चाहते हार्दिक पांड्यावर अजिबात खुश दिसत नव्हते. मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्या जेव्हा टॉससाठी मैदानात आला तेव्हा मैदानातील चाहत्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले. हार्दिकला रोहित शर्माच्या जागी कर्णधार बनवण्यात आले, तेव्हापासून तो चाहत्यांच्या टार्गेटवर आहे. हार्दिक गोलंदाजीला आला तेव्हादेखील चाहत्यांनी रोहित-रोहित अशा घोषणा द्यायला सुरुवात केली.

टॉसवेळी जेव्हा हार्दिक मैदानात आला तेव्हा संपूर्ण रोहित-रोहितच्या घोषणा देत होते. यावेळी इंग्लिश समालोचक केविन पीटरसन म्हणाला की, भारतातील क्रिकेटपटूला अशाप्रकारे ट्रोल करण्याची पहिलीच घटना मी पाहिली आहे.

हार्दिकला चाहते ट्रोल करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडीओत स्टँडमध्ये बसलेले चाहते हार्दिक पांड्याला 'छपरी-छपरी' म्हणतानाही दिसत आहेत. हार्दिक मुंबईचा कर्णधार झाल्यापासून त्याला चाहत्यांकडून द्वेषाचा सामना करावा लागत आहे. आता लाइव्ह मॅचमध्येही चाहत्यांनी त्याच्याबद्दल द्वेष व्यक्त केला.

यावर हार्दिक आतापर्यंत तरी शांत दिसून आला आहे. त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण हे व्हायरल झालेले व्हिडिओ खरोखरच धक्कादायक आहेत. आयपीएलच्या इतिहासात असे क्वचितच घडले आहे जेव्हा चाहत्यांनी भारतीय खेळाडूवर असा राग काढला आहे.

शेवटच्या षटकात मुंबईचा पराभवच

IPL २०२४ च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरे जावे लागले. गुजरातने दिलेल्या १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ ९ गडी गमावून १६२ धावाच करू शकला. अखेरच्या षटकात संघाला १९ धावांची गरज होती. हार्दिकने पहिल्या दोन चेंडूंवर १० धावा केल्या, पण उमेश यादवने पुढच्या दोन चेंडूंवर २ बळी घेत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Whats_app_banner