एआय धोकादायक? विराट कोहलीचा 'तो' व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी व्यक्त केली चिंता-fake video of virat kohli berating shubman gill goes viral ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  एआय धोकादायक? विराट कोहलीचा 'तो' व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी व्यक्त केली चिंता

एआय धोकादायक? विराट कोहलीचा 'तो' व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी व्यक्त केली चिंता

Aug 29, 2024 04:39 PM IST

Virat Kohli Viral Video: विराट कोहलीचा व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विराट कोहलीच्या चाहत्याने एआय फीचर्सबाबत चिंता व्यक्त केली.

विराट कोहलीचा व्हिडिओ व्हायरल
विराट कोहलीचा व्हिडिओ व्हायरल (BCCI)

Virat Kohli On Shubman Gill: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कोहली भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिलवर टीका करताना दिसत आहे. परंतु, हा व्हिडिओ खोटा असल्याची माहिती समोर आली. व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुन्या मुलाखतीचा आहे. व्हिडिओमध्ये कोहलीचा आवाज आणि चेहऱ्यावरील हावभावांची नक्कल करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजेच एआय फीचर्सचा वापर करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये विराट कोहलीने शुभमन गिलचा अपमान केल्याचे दाखवण्यात आले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये विराट कोहली असे बोलत आहे की,'जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियाहून परत आलो, तेव्हा मला समजले की, उच्च स्तरावर यशस्वी होण्यासाठी काय केले पाहिजे. मी शुभमन गिलकडे बारकाईने पाहत आहे. तो प्रतिभावान आहे, यात शंका नाही. पण बॅटने दम दाखवणे लीजेंड यांच्यात खूप मोठा फरक आहे. गिल चांगला खेळाडू आहे, पण आपण जे आहोत तेच राहिले पाहिजे आणि स्वतःला महान दाखवण्याचा प्रयत्न करू नये.'

पुढे व्हिडिओत विराट कोहली असे बोलताना दिसत आहे की, ‘लोक शुभमन गिलमध्ये पुढचा विराट कोहली पाहत आहेत. परंतु, मी हे स्पष्ट करतो की, विराट कोहली फक्त एकच आहे. मी क्रिकेट विश्वातील सर्वात घातक गोलंदाजांचा सामना केला आहे. सर्वात कठीण परिस्थितीत संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. असे मी अनेकदा केले आहे. फक्त काही चांगल्या खेळी करून तुम्ही त्याची पुनरावृत्ती करू शकत नाही.’

विराट कोहलीचा हा व्हिडिओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परंतु, हा व्हिडिओ खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्हिडिओची सर्वात खास गोष्ट म्हणजे, विराट जेव्हा या गोष्टी बोलतो, तेव्हा त्याला बोलताना दाखवले जात नाही. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजन प्रतिक्रिया येत आहेत. अशा व्हिडिओमुळे एखाद्या आयुष्य उध्वस्त होऊ शकते. तसेच एआय फीचर्स धोकादायक असल्याचेही बोलले जात आहे.

विभाग