Watch : पंतप्रधानांनी पॅट कमिन्सचं अभिनंदन केलं नाही! मोदींच्या या व्हायरल व्हिडीओचं सत्य काय? पाहा
Narendra Modi World Cup final : वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या नावाने असलेल्या स्टेडियमवर पोहोचले होते. ऑस्ट्रेलियाचे डेप्युटी पीएम रिचर्ड मार्ल्स हे देखील मोदींसोबत स्टेडियममध्ये आले होते.
क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. या पराभवासह कोट्यवधी भारतीयांची स्वप्ने भंगली. टीम इंडिया आणि भारतीय क्रिकेट फॅन्स १२ वर्षांपासून वर्ल्डकप ट्रॉफीच्या प्रतिक्षेत आहे. तर ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्डकप ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
ट्रेंडिंग न्यूज
वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या नावाने असलेल्या स्टेडियमवर पोहोचले होते. ऑस्ट्रेलियाचे डेप्युटी पीएम रिचर्ड मार्ल्स हे देखील मोदींसोबत स्टेडियममध्ये आले होते.
सामना संपल्यानंतर दोन्ही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजयी संघाला ट्रॉफी प्रदान करण्यात आली. मोदी आणि मार्ल्स या दोघांनी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला ट्रॉफी दिली.
पीएम मोदींचा व्हिडिओ व्हायरल
नरेंद्र मोदी हे पॅट कमिन्सला ट्रॉफी देतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये मोदी पॅट कमिन्ससोबत उभे आहेत. ट्रॉफी दिल्यानंतर मोदी स्टेजपासून दूर जातात. आता हा व्हिडीओ शेअर करून काहीजण दावा करत आहेत, मोदींनी पॅट कमिन्सचे अभिनंदन केले नाही."
व्हिडिओचे सत्य काय आहे?
पण या व्हायरल व्हिडिओचे सत्य काही वेगळेच आहे. नरेंद्र मोदींचा सोशल मीडियावर शेअर होत असलेला व्हिडिओ एडिट करण्यात आला आहे. ट्रॉफी देताना नरेंद्र मोदींनी पॅट कमिन्सशी संवाद साधत त्याचे अभिनंदन केले होते. त्यानंतर दोघांनी हस्तांदोलनही केले.
ऐवढीच नाहीतर स्टेजवरून खाली आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी खाली उभ्या असलेल्या इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंशीही हस्तांदोलन केले. पीएम मोदींची भेट घेतल्यानंतरच ऑस्ट्रेलियाचे खेळाडू त्यांच्या कॅप्टनसोबत सेलिब्रेशन करण्यासाठी मंचावर पोहोचले.