बांगलादेशातील सत्तापालटानंतर परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. आंदोलकांनी हळूहळू तेथील क्रिकेटपटूंच्या घरांनाही टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान हसिना शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर सत्तापालट झाला. पदाचा राजीनामा दिल्यानंतर हसीना शेखने देश सोडून पळ काढला.
या दरम्यान, बांगलादेशी हिंदू क्रिकेटपटू लिटन दासच्या घरावर हल्ला करून घर ताब्यात देण्यात आल्याची बातमी आली होती, मात्र हा दावा पूर्णपणे खोटा आहे.
बांगलादेशातील निदर्शने आणि दंगलींदरम्यान पंतप्रधान शेख हसीना यांनी घाईघाईने राजीनामा दिला आणि कसा तरी देश सोडून हेलिकॉप्टरने भारतात आल्या. हजारो आंदोलकांनी त्यांच्या घरावर हल्ला केला, दरवाजे तोडले आणि तेथील सर्व काही नष्ट केले. यामुळेच त्यांनी देश सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, या घटनानंतर सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, दंगलखोरांनी बांगलादेश क्रिकेट संघाचा हिंदू क्रिकेटपटू लिटन दास आणि खासदार माजी क्रिकेटपटू मशरफी मोर्तझा यांच्या घरांना आग लावली.
याशिवाय पंतप्रधानांचे शासकीय निवासस्थान असलेल्या आलिशान 'गणभवन'वरही जमावाने हल्ला केला. जमावाने त्यांचा टीव्ही, फर्निचर आणि इतर अनेक वस्तू, अगदी कपडे आपल्या घरी घेऊन गेले. शेख हसीना यांनी बांगलादेशातून पलायन करून आपला १५ वर्षांचा सत्तेतील दुसरा कार्यकाळ संपवला आहे. वडील मुजीब उर रहमान यांचा वारसा पुढे चालू ठेवत त्यांनी गेल्या ३० वर्षांपैकी २० वर्षे बांगलादेशचे नेतृत्व केले.
बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर हल्ले होत असताना लिटन दास याचे घर जाळल्याची बातमी वणव्यासारखी पसरली. मात्र, X वर पोस्ट लिहिणाऱ्या एका बांगलादेशी पत्रकाराने ही बातमी मूर्खपणाची असल्याचे म्हटले आहे.
लिटन दाससोबत अशी घटना घडली नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी लिहिले की, ३० मिनिटांत एका फेक न्यूजला ६ हजार लाइक (हे मशरफी मोर्तझाचे घर आहे)... आपल्या देशात भीती आणि फूट निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांशी लढण्यासाठी आपल्याला अजून बरेच काम करायचे आहे'.
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये जळालेले घर लिटन दासचे नसून बांगलादेशचा माजी कर्णधार मशरफी मोर्तझा याचे आहे.
दरम्यान, लिटन दास जेव्हा जेव्हा सोशल मीडियावर त्याच्या देवांची छायाचित्रे शेअर करतो किंवा एखाद्या सणावर काही पोस्ट करतो तेव्हा कट्टरतावादी त्याला प्रचंड ट्रोल करतात.
दुसरीकडे, बांगलादेशची स्थिती श्रीलंकेसारखी झाली आहे. तिथे दंगलखोर काय करतील याची कोणालाच कल्पना नाही. सध्या लष्कर सर्व काही हाताळत आहे. अशीच स्थिती राहिल्यास बांगलादेशातील परिस्थिती आणखी बिकट होईल. अशा परिस्थितीत कुठलेही घर किती काळ सुरक्षित राहील हे सांगणे कठीण आहे.