बीसीसीआयच्या माजी सचिवांनी माझं करिअर संपवलं! गांगुली, द्रविडसोबत खेळलेल्या क्रिकेटपटूचा गंभीर आरोप-ex india cricketer gyanendra pandey rose to fame with sourav ganguly rahul dravid virender sehwag is now working at sbi ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  बीसीसीआयच्या माजी सचिवांनी माझं करिअर संपवलं! गांगुली, द्रविडसोबत खेळलेल्या क्रिकेटपटूचा गंभीर आरोप

बीसीसीआयच्या माजी सचिवांनी माझं करिअर संपवलं! गांगुली, द्रविडसोबत खेळलेल्या क्रिकेटपटूचा गंभीर आरोप

Aug 28, 2024 05:31 PM IST

Ex Indian cricketer alleges Ex-BCCI Secretary: सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यासोबत आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या माजी क्रिकेटपटूने बीसीसीआयचे माजी सचिव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

गांगुली- द्रविडसोबत खेळलेल्या माजी क्रिकेटपटूचा आरोप
गांगुली- द्रविडसोबत खेळलेल्या माजी क्रिकेटपटूचा आरोप (X)

Gyanendra Pandey: भारतात १९९९ मध्ये पेप्सी चषक खेळवण्यात आला. या तिरंगी मालिकेत भारताव्यतिरिक्त पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन संघ सहभागी झाले होते. अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला, जिथे भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या मालिकेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण तीन सामने खेळले गेले आणि अंतिम सामन्यासह सर्व सामन्यांमध्ये भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

या मालिकेत पाकिस्तानविरुद्धच्या दोन साखळी सामन्यांमध्ये ज्ञानेंद्र पांडे भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. याशिवाय सौरव गांगुली, राहुल द्रविड, अजित आगरकर, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, मोहम्मद अझरुद्दीन आणि अजय जडेजा अशी नामवंत नावे या मालिकेचा भाग होती. ज्ञानेंद्र पांडेने आपल्या कारकिर्दीत केवळ दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि दोन्ही पाकिस्तानविरुद्ध एकाच तिरंगी मालिकेत खेळले आहेत. डावखुरा फिरकीपटू आणि फलंदाज ज्ञानेंद्र पांडे सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पीआर एजंट म्हणून काम करत आहे.

दुर्दैवाने, ज्ञानेंद्रयांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार काळ टिकू शकली नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करूनही तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवू शकला नाही. लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत ज्ञानेंद्र पांडे म्हणाले की, ‘१९९७ मध्ये मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये मी ४४ धावा केल्या आणि तीन विकेट्सही घेतल्या. याशिवाय देवधर करंडक स्पर्धेतही माझी कामगिरी अप्रतिम होती. उत्तर विभागात विक्रम राठोड, वीरेंद्र सेहवाग, नवज्योतसिंह सिद्धू यांचा समावेश होता. मी पाच विकेट घेतल्या आणि नाबाद २३ धावा केल्या. पश्चिम विभागाविरुद्ध मी नाबाद ८९, पूर्व विभागाविरुद्ध २-३ आणि दक्षिण विभागाविरुद्ध २८ किंवा ३० धावा केल्या आणि दोन-तीन विकेट्सही घेतल्या. चॅलेंजर ट्रॉफीमध्ये मी रॉबिन सिंह आणि अमेय खुरासिया यांच्या विकेट्स घेतल्या होत्या. भारत अ संघाकडून मी २६ धावांत दोन बळी घेतले आणि त्यानंतर मला भारतीय संघात स्थान मिळाले.’

१९९९ ची गोष्ट आहे. १९९९ मध्ये ज्ञानेंद्र पांडेलाही न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्थान मिळाले होते, पण बीसीसीआयचे माजी सचिव जयंत लेले यांनी त्यांच्या निवडीत अडथळा निर्माण केला. त्यावेळी जयंत लेले म्हणाले होते की, ‘अनिल कुंबळेला विश्रांती हवी असेल तर सुनील जोशीला संघात स्थान का मिळू नये?’ त्यावर ज्ञानेंद्र म्हणाले की, 'लेले काय बोलत होते, याचा विचार करायला हवा होता. त्यांनी माझी कामगिरी बघायला हवी होती. ते पंचही होते. मला समजले की ही माझी चूक होती. मला त्यावेळी युक्त्या माहीत नव्हत्या, त्यामुळे गोष्टी कशा चालतात? हे मला माहित नव्हते. मी ते सहन करू शकलो नाही आणि माझी बदनामी झाली. यानंतर प्रसारमाध्यमांनी माझी साईड स्टोरी प्रसिद्ध केली नाही, मला कोणी काही विचारायला आले नाही. '

 

विभाग