ENG vs PAK T20 Series Live Streaming Details : टी-20 वर्ल्डकप २०२४ ला आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. अशा स्थितीत या सर्व संघ या स्पर्धेची जोरदार तयारी करत आहेत. या तयारीचा एक भाग म्हणून पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्या ४ टी-20 सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही मालिका २२ मे पासून सुरू होत आहे. या मालिकेत जोस बटलर इंग्लंड संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचवेळी बाबर आझम पाकिस्तान संघाचे नेतृत्व करणार आहे. अशा परिस्थितीत, भारतात या मालिकेचे सामने कधी, कुठे आणि कसे पाहता येतील हे आपण येथे जाणून घेणार आहोत.
या मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ आधीच जाहीर झाला आहे. त्याचबरोबर या मालिकेत इंग्लंड टी-२० विश्वचषकासाठी निवडलेल्या संघासोबत खेळणार आहे. या मालिकेतील ३ सामने भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजल्यापासून खेळवले जातील. तर, मालिकेतील दुसरा सामना संध्याकाळी ७ वाजल्यापासून खेळवला जाईल.
भारतातील चाहत्यांना या मालिकेचे सामने टीव्हीवर पाहता येणार आहेत. त्याचबरोबर या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंगही भारतात केले जाणार आहे. या मालिकेचे थेट प्रक्षेपण भारतातील सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. त्याच वेळी, आपण Sony Liv वर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार आहे.
टी-20 मालिकेसाठी इंग्लंड संघ- फिल सॉल्ट, जोस बटलर, बेन डकेट, हॅरी ब्रूक, विल जॅक्स, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम केर्न, जॉनी बेअरस्टो, जोफ्रा आर्चर, टॉम हार्टले, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद, रीस टोपली आणि मार्क वुड.
पाकिस्तान संघ- बाबर आझम, फखर जमान, मोहम्मद रिझवान, सॅम अयुब, इफ्तिखार अहमद, इरफान खान, आगा सलमान, इमाद वसीम, शादाब खान, आझम खान, उस्मान खान, अबरार अहमद, हारिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी, हसन अली, अब्बास आफ्रिदी, मोहम्मद. आमिर आणि नसीम शाह.
पहिला टी-20- २२ मे रात्री रात्री ११ वाजता (लीड्स)
दुसरा टी-20- २५ मे रात्री रात्री ७ वाजता (बर्मिंगहॅम)
तिसरा टी-20- २८ मे रात्री रात्री ११ वाजता (कार्डिफ)
चौथा टी-20- ३० मे रात्री रात्री ११ वाजता (लंडन)