भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी त्याच्या फलंदाजी आणि कॅप्टन्सीसह उत्कृष्ट रिव्ह्यूसाठी ओळखला जात होता. खरंतर, माहीबद्दल असं म्हटलं जातं की डीआरएसच्या बाबतीत सर्वोत्तम आहे. महेंद्रसिंह धोनीचे रिव्ह्यूज अनेकदा योग्य ठरतात.
रिव्ह्यूच्या बाबतीत धोनी सर्वोत्तम आहे. तर इंग्लंडचा सध्याचा कसोटी कर्णधार ओली पोप हा डीआरएस घेण्याच्या बाबतीत सर्वात वाईट आहे. ओली पोप सध्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडचे कर्णधारपद सांभाळात आहे.
आकडेवारीनुसार ओली पोप याने आतापर्यंत घेतलेले सर्व रिव्ह्यू १००% चुकीचे ठरले आहेत. होय... तुम्ही बरोबर वाचले. ऑली पोप हा रिव्हयू घेण्याच्या बाबतीत अत्यंत वाईट असल्याचे सिद्ध झाले आहे.
आकडेवारीनुसार, इंग्लंडचा कर्णधार म्हणून ऑली पोप याने श्रीलंकेविरुद्ध आतापर्यंत १० रिव्ह्यू घेतले, पण त्यात किती यश मिळाले? ओली पोपची सर्व रिव्ह्यू चुकीचे सिद्ध झाले आहेत. ऑली पोपने विरोधी फलंदाजांविरुद्ध १० वेळा डीआरएसचा वापर केला, परंतु प्रत्येक वेळी निराश हाती आली.
यानंतर ओली पोप सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. ऑली पोपबद्दल क्रिकेट चाहते सतत त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ओली पोप इंग्लंडचे नेतृत्व करत आहे.
जर आपण इंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिकेबद्दल बोललो तर यजमान इंग्लंड २-० ने पुढे आहे. मात्र, तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेची स्थिती मजबूत दिसत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेची धावसंख्या १ गडी बाद ९४ धावा आहे. आता श्रीलंकेला विजयासाठी १२५ धावांची गरज आहे.
श्रीलंकेकडून कुसल मेंडिस आणि पथुम निशांका क्रीजवर आहेत. कुसल मेंडिसने २५ चेंडूत ३० धावा केल्या आहेत. तर पथुम निशांकने ४४ चेंडूत ५३ धावा केल्या. दोन्ही खेळाडूंमध्ये ५५ धावांची भागीदारी झाली आहे.