भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका २५ जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. पण मालिकेपूर्वीच इंग्लंडच्या आजा-माजी खेळाडूंनी टीम इंडियावर शाब्दिक हल्ला सुरू केला आहे.
वास्तविक, या संपूर्ण मालिकेत सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असतील. अशा परिस्थितीत इंग्लंडच्या आजी आणि माजी खेळाडूंना आतापासूनच विराट कोहलीची चिंता सतावू लागली आहे. त्यामुळे इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने विराटला लवकर कसे बाद करायचे, यावर एक युक्ती सुचवली आहे.
इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज माँटी पानेसरच्या मते, विराटला लवकर बाद करायचे असेल तर त्याचा इगो हर्ट केला पाहिजे.'
एका मुलाखतीत मॉन्टी पानेसरने हे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला,की “विराट कोहलीच्या अहंकाराशी खेळा आणि त्याला व्यस्त ठेवा. तसेच, तुम्ही विराटला हेही टोमणे मारू शकता की, विराट आणि त्याचा संघ चोकर्स आहेत. ते नेहमी मोठ्या सामन्यांमध्ये पराभूत होतात.
तुम्ही त्याला अशा प्रकारे स्लेज करू शकता कारण बेन स्टोक्सने एकदिवसीय आणि टी 20 विश्वचषक जिंकला आहे पण कोहलीने जिंकला नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना अशा प्रकारे पिंच करू शकता.”
माँटी पानेसर पुढे म्हणलाा की, जेम्स अँडरसन विराट कोहलीला जास्त वेळ मैदानावर राहू देणार नाही. २०१४ च्या कसोटी मालिकेत अँडरसनने ४ वेळा कोहलीला बाद केले होते. मात्र, अँडरसनला भारतीय मैदानावर विराट कोहलीला एकदाही बाद करता आलेले नाही.
तसेच, गेल्या १० कसोटी सामन्यात अँडरसनच्या गोलंदाजीवर विराट कोहली केवळ एकदाच बाद झाला आहे. तर कोहलीने अँडरसनविरुद्ध ३०५ धावा केल्या आहेत.
२०१३ साली इंग्लंडने भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकली होती. त्यावेळी मॉन्टी पानेसनेर या मालिका विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसरा इंग्लिश गोलंदाज होता. पण या मालिकेनंतर भारतीय संघाने घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, एस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर. जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.
संबंधित बातम्या