IND vs ENG : बेन डकेट- जो रूटची अर्धशतकं, कटक वनडेत टीम इंडियासमोर ३०५ धावांचे लक्ष्य
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG : बेन डकेट- जो रूटची अर्धशतकं, कटक वनडेत टीम इंडियासमोर ३०५ धावांचे लक्ष्य

IND vs ENG : बेन डकेट- जो रूटची अर्धशतकं, कटक वनडेत टीम इंडियासमोर ३०५ धावांचे लक्ष्य

Published Feb 09, 2025 05:17 PM IST

India vs England 2nd ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. दोन्ही संघ कटक येथील बाराबती स्टेडियमवर आमनेसामने आहेत.

IND vs ENG : बेन डकेट- जो रूटची अर्धशतकं, कटक वनडेत टीम इंडियासमोर ३०५ धावांचे लक्ष्य
IND vs ENG : बेन डकेट- जो रूटची अर्धशतकं, कटक वनडेत टीम इंडियासमोर ३०५ धावांचे लक्ष्य (AFP)

India vs England 2nd ODI Scorecard : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना कटक येथे खेळला जात आहे. बाराबती स्टेडियमवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ५० षटकात सर्वबाद ३०४ धावा केल्या.

इंग्लंडकडून बेन डकेट आणि जो रूट यांनी अर्धशतकी खेळी खेळली. या वनडे मालिकेत भारतीय संघ सध्या १-० ने आघाडीवर आहे. आता हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

इंग्लंडने ४९.५ षटकांत ३०३४ धावा केल्या. भारताकडून अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने सर्वाधिक ३ बळी घेतले. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फिल सॉल्ट आणि डकेट यांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली.

रूट आणि डकेट व्यतिरिक्त लियाम लिव्हिंगस्टोन याने ३२ चेंडूत ४१ धावा केल्या ज्यामुळे संघ आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला. सुरुवातीला इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना खूप त्रास दिला, पण शेवटी त्यांच्या विकेट पडत राहिल्यामुळे भारताला धावगती नियंत्रित करण्यात यश आले.

मात्र, असे असतानाही इंग्लंडचा संघ ३०० धावांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला. इंग्लंडकडून फिल सॉल्टने २६ धावा, हॅरी ब्रूकने ३१ धावा, कर्णधार जोस बटलरने ३४ धावा, आदिल रशीदने १४ धावा, जेमी ओव्हरटनने ६ धावा आणि गस ऍटकिन्सनने ३ धावा केल्या.

भारताकडून जडेजाशिवाय मोहम्मद शमी, हर्षित राणा, हार्दिक पांड्या आणि नवोदित वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.

इंग्लंड- फिल सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, गस ऍटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वुड, साकिब महमूद.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या