India vs England 1st T20 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेला उद्या बुधवारपासून (२२ जानेवारी) सुरुवात होणार आहेत. पण इंग्लंडने एक दिवसआधीच पहिल्या टी-20 सामन्यासाठी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. भारत-इंग्लंड पहिला टी-20 सामन कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे.
या सामन्यात लँकेशायरचा फिल सॉल्ट विकेटकीपिंग करणार आहे. तो नॉटिंगहॅमशायरच्या बेन डकेटसोबत सलामीला खेळेले. तर कर्णधार जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. सोबतच वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि मार्क वुड यांनाही प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले आहे.
जोफ्रा आर्चरने याआधी २० मार्च २०२१ रोजी भारतीय भूमीवर शेवटचा टी-20 सामना खेळला होता. अशा परिस्थितीत तो तब्बल ४ वर्षांनी क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय भूमीवर येत आहे. आपल्या वेगवान चेंडूंमुळे तो भारतीय संघासाठी अडचणीचा ठरू शकतो.
पहिल्या टी-20 साठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन: बेन डकेट, फिल सॉल्ट (विकेटकीपर), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.
सूर्यकुमार यादव टी-20 मालिकेत संघाचे नेतृत्व करणार आहे. या मालिकेसाठी अक्षर पटेलला उपकर्णधार बनवण्यात आले आहे, तर अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचाही संघात समावेश करण्यात आला आहे. शमी २०२३ च्या वनडे वर्ल्ड कपनंतर ॲक्शनपासून दूर होता.
३४ वर्षीय मोहम्मद शमीचे तब्बल १४ महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. २०२३ च्या विश्वचषकानंतर शमीवर शस्त्रक्रिया झाली होती. डाव्या गुडघ्याला सूज आल्याने शमीला नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यालाही मुकावे लागले होते. या T20 मालिकेसाठी निवडकर्त्यांनी ध्रुव जुरेलची दुसरा यष्टिरक्षक म्हणून निवड केली आहे. तर संजू सॅमसन पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक म्हणून संघाचा एक भाग आहे.
इंग्लंड टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया- सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुवत जुरेल (यष्टीरक्षक).
संबंधित बातम्या