IND vs ENG : चॅम्पियन्स ट्रॉफी आणि भारत दौऱ्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या खेळाडूची कर्णधारपदी निवड
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG : चॅम्पियन्स ट्रॉफी आणि भारत दौऱ्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या खेळाडूची कर्णधारपदी निवड

IND vs ENG : चॅम्पियन्स ट्रॉफी आणि भारत दौऱ्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या खेळाडूची कर्णधारपदी निवड

Dec 22, 2024 04:46 PM IST

IND vs ENG Full Squad : भारत दौऱ्यासाठी इंग्लंडने संघ जाहीर केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात जानेवारी २०२५ मध्ये एकदिवसीय आणि टी-20 मालिका होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्येही हाच संघ खेळणार आहे.

IND vs ENG : चॅम्पियन्स ट्रॉफी आणि भारत दौऱ्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या खेळाडूची कर्णधारपदी निवड
IND vs ENG : चॅम्पियन्स ट्रॉफी आणि भारत दौऱ्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या खेळाडूची कर्णधारपदी निवड (AP)

IND vs ENG full squad announced : भारत आणि इंग्लंड यांच्यात २२ जानेवारीपासून टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने यासाठी संघ जाहीर केला आहे. संघाने जोस बटलरकडे कर्णधारपद सोपवले आहे.

बटलर हा अनुभवी खेळाडू असून त्याने अनेक प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे. जोफ्रा आर्चर हा वनडे आणि टी-20 या दोन्ही संघांचा भाग आहे. गस ऍटकिन्सन यालाही दोन्ही संघात स्थान मिळाले आहे. हॅरी ब्रूक आणि बेन डकेट यांच्यावरही संघाने विश्वास व्यक्त केला आहे.

तीन वनडे आणि ५ टी-20 सामन्यांची मालिका

भारत आणि इंग्लंड यांच्यात ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. इंग्लंडने एकदिवसीय मालिकेसाठी अनुभवी गोलंदाज जोफ्रा आर्चर तसेच मार्क वुड, जेमी स्मिथ आणि आदिल रशीद यांचा समावेश केला आहे. राशिदने इंग्लंडसाठी अनेक वेळा चमत्कार दाखवले आहेत. फिल सॉल्ट देखील संघाचा भाग आहे. जेमी ओव्हरटन आणि साकिब महमूदही संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत.

युवा स्टार जेकब बेथेल भारतात येणार

इंग्लंडचा टी-20 संघही खूप मजबूत आहे. या मालिकेतही बटलर कर्णधार असेल. आर्चर टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत खेळणार आहे. जेकब बेथेल याला टी-20 मालिकेसाठी संधी मिळाली आहे. तो एक अप्रतिम खेळाडू आहे आणि त्याने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. ब्रूक आणि बेन डकेट टी-20 मालिकेचा भाग आहेत. ते वनडेतही खेळणार आहे.

असा असेल इंग्लंडचा भारत दौरा 

भारत आणि इंग्लंड यांच्यात 3 एकदिवसीय आणि ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना २२ जानेवारीला कोलकाता येथे होणार आहे.

या मालिकेतील शेवटचा सामना २ फेब्रुवारीला मुंबईत होणार आहे. यानंतर ६ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. पहिली वनडे नागपुरात, दुसरी वनडे कटकमध्ये आणि तिसरी वनडे अहमदाबादमध्ये होणार आहे.

विशेष म्हणजे, या मालिकेनंतर पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. आयसीसीच्या या स्पर्धेसाठीदेखील जोस बटलर याच्या नेतृत्वात इंग्लंडचा हाच संघ खेळणार आहे.

भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड संघ - जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद , फिल सॉल्ट, मार्क वुड.

भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी इंग्लंड संघ - जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रेडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वुड.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी इंग्लंड संघ - जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रेडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वुड.

Whats_app_banner

संबंधित बातम्या