मृत्यू पाहिलेला क्रिकेटर… एक सेकंद जरी उशीर झाला असता तर मगरींनी तुकडे केले असते, बॉथम यांनी सांगितला थरार
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  मृत्यू पाहिलेला क्रिकेटर… एक सेकंद जरी उशीर झाला असता तर मगरींनी तुकडे केले असते, बॉथम यांनी सांगितला थरार

मृत्यू पाहिलेला क्रिकेटर… एक सेकंद जरी उशीर झाला असता तर मगरींनी तुकडे केले असते, बॉथम यांनी सांगितला थरार

Nov 09, 2024 05:58 PM IST

Ian Botham Crocodile Incident : इयान बॉथम आणि माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मर्व्ह ह्युजेस हे एकत्र मासेमारी करत होते. त्यावेळी बोथम अचानक नदीत पडले आणि त्यांचे पुढे काय झाले, ही घटना त्यांना आयुष्यभर लक्षात राहील.

Ian Botham falls into river full of crocodiles : मृत्यू पाहिलेला क्रिकेटर… एक सेकंद जरी उशीर झाला असता तर मगरींनी तुकडे केले असते, बॉथम यांनी सांगितला थरार
Ian Botham falls into river full of crocodiles : मृत्यू पाहिलेला क्रिकेटर… एक सेकंद जरी उशीर झाला असता तर मगरींनी तुकडे केले असते, बॉथम यांनी सांगितला थरार

इंग्लंडचे महान क्रिकेटर इयान बॉथम यांनी एक किस्सा सांगून सर्वांना हदरवून सोडले आहे. प्रत्यक्षात ही काही काल्पनिक कथा नसून सत्य घटना आहे. जर बॉथम यांनी एक सेकंदही उशीर केला असता तर मगरी आणि शार्क माशांनी त्यांच्या शरीराचे तुकडे केले असते.

इयान बॉथम आणि माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मर्व्ह ह्युजेस हे एकत्र मासेमारी करत होते. त्यावेळी बोथम अचानक नदीत पडले आणि त्यांचे पुढे काय झाले, ही घटना त्यांना आयुष्यभर लक्षात राहील.

ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागात असलेल्या मोयल नदीत ही घटना घडली. इयान बोथम आणि मर्व्ह ह्यूज चार दिवसांच्या मासेमारी दौऱ्यावर गेले होते. या दरम्यान, बोटीला बांधलेल्या दोरीत त्यांची चप्पल अडकली आणि ते पाण्यात पडले. पडल्यामुळे त्याच्या अंगावर ओरखडे उमटले, पण त्याहून भयंकर गोष्ट म्हणजे ते मगरी आणि धोकादायक शार्क यांच्या तावडीतून थोडक्यात बचावले.

या घटनेची आठवण करून देताना इयान बॉथम यांनी सांगितले, "मगरींच्या तावडीतून मी बचावलो. मी पाण्यात ज्या वेगात पडलो त्यापेक्षा वेगाने बाहेर आलो. काही मगरी कदाचित माझ्याकडे टक लावून पाहत होत्या. पण पाण्यात काय आहे ते मला दिसत नव्हते."

इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटपटूने सांगितले की हे सर्व खूप वेगाने घडले, परंतु चांगली गोष्ट म्हणजे ते आता सुरक्षित आणि पूर्णपणे ठीक आहेत.

मॉयल नदी धोकादायक जीवासांठी प्रसिद्ध

ऑस्ट्रेलियात २ लाखांहून अधिक मगरी आहेत आणि त्यांची संख्या विशेषतः उत्तरेकडील भागात जास्त आहे. मॉयल नदी मगरींसाठीही प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये साधारणपणे एक चौरस किलोमीटरमध्ये ५ मगरी दिसतात. त्यामुळे बोथम पाण्याबाहेर सुखरूप बाहेर पडणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही.

इयान बोथम यांची क्रिकेट कारकिर्द

जर आपण इयान बोथमच्या क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यानी इंग्लंडसाठी १०२ कसोटी सामने खेळले आणि ३८३ विकेट घेण्यासोबतच त्याने ५२०० धावाही केल्या. त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत १४ शतके आणि २२ अर्धशतकेही झळकावली. दुसरीकडे, त्यांच्या नावावर ११६ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४५ विकेट आणि २११३ धावा आहेत. या आकडेवारीमुळे ते केवळ इंग्लंडमधीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहेत.

Whats_app_banner