इंग्लंड क्रिकेट संघाचे यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टो यांची फलंदाजी तुम्ही पाहिलीच असेल. जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टो यांनी आपल्या फलंदाजीने क्रिकेट जगताला चकीत केले आहे.
आता इंग्लंड क्रिकेटला बेयरस्टो आणि बटलप्रमाणेच नवा विकेटकीपर फलंदाज मिळाला आहे. जेमी स्मिथ असे त्या गुणी विकेटकीपर फलंदाजाचे नाव आहे. विशेष म्हणजे, जेमी स्मिथ हा बटलर आणि बेयरस्टोपेक्षा जास्त खतरनाक असल्याचे बोलले जात आहे. इंग्लंडचा २४ वर्षीय जेमी स्मिथ हा आपल्या फलंदाजीने सर्वांची मनं जिंकत आहे.
जेमी स्मिथ याची क्रिेकेट आकडेवारी सांगते, की तो विरोधी गोलंदाजांसाठी मोठी समस्या आहे. आत्तापर्यंत, जेमी स्मिथने ५ कसोटी सामन्यांमध्ये १ शतक आणि दोनदा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. टेस्ट फॉरमॅटमध्ये जेमी स्मिथने ७०.१४ च्या स्ट्राइक रेटने आणि ५०.५ च्या सरासरीने ४०४ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये जेमी स्मिथची सर्वोत्तम धावसंख्या १११ धावा आहे.
याशिवाय जेमी स्मिथने इंग्लंडकडून २ वनडे सामने खेळले आहेत. वनडे फॉरमॅटमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नाही, मात्र आगामी काळात हा फलंदाज आपल्या स्फोटक फलंदाजीने छाप सोडण्यास सज्ज असल्याचे मानले जात आहे.
त्याचवेळी, जोस बटलरच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर, या यष्टीरक्षक फलंदाजाने ५७ कसोटी सामन्यांसह १८१ एकदिवसीय आणि १२४ टी-20 सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे.
जोस बटलरच्या नावावर कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मध्ये अनुक्रमे २९०७, ५०२२ आणि ३२६४ धावा आहेत. या तीन फॉरमॅटमध्ये जोस बटलरने अनुक्रमे २, ११ आणि १ वेळा शतकाचा टप्पा ओलांडला आहे.
जॉनी बेअरस्टोबद्दल बोलायचे झाले तर १०० कसोटी सामन्यांसह या फलंदाजाने १०७ वनडे आणि ८० टी-२० सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. या तीन फॉरमॅटमध्ये जॉनी बेअरस्टोच्या नावावर अनुक्रमे ६०४२, ३८६८ आणि १६७१ धावा आहेत.