Jofra Archer : जोफ्रा आर्चर पुनरागमन करण्यासाठी सज्ज, या सामन्यातून करणार कमबॅक!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Jofra Archer : जोफ्रा आर्चर पुनरागमन करण्यासाठी सज्ज, या सामन्यातून करणार कमबॅक!

Jofra Archer : जोफ्रा आर्चर पुनरागमन करण्यासाठी सज्ज, या सामन्यातून करणार कमबॅक!

Apr 06, 2024 03:30 PM IST

Jofra Archer Comeback Update : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर टी-20 विश्वचषकात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी ही माहिती दिली आहे.

Jofra Archer Comeback Update जोफ्रा आर्चर पुनरागमन करण्यासाठी सज्ज, या सामन्यातून करणार कमबॅक!
Jofra Archer Comeback Update जोफ्रा आर्चर पुनरागमन करण्यासाठी सज्ज, या सामन्यातून करणार कमबॅक! (AP)

सध्या आयपीएल २०२४ चा थरार सुरू आहे. आयपीएलनंतर लगेचच टी-20 विश्वचषक २०२४ वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या भूमीवर खेळवला जाणार आहे. मात्र, या स्पर्धेपूर्वी इंग्लंडसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

वास्तविक, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर टी-20 विश्वचषकात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी ही माहिती दिली आहे.

रॉब की म्हणाले की, जोफ्रा आर्चर पूर्णपणे तंदुरुस्त आहे. तो एका वर्षाहून अधिक काळ मैदानापासून दूर आहे. मात्र आता आर्चर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

जोफ्रा आर्चर पाकिस्तानविरुद्ध खेळू शकतो

टी-20 विश्वचषकापूर्वी इंग्लंड पाकिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत जोफ्रा आर्चर खेळू शकतो. जोफ्रा आर्चर गेल्या तीन वर्षांपासून सतत दुखापतीने त्रस्त आहे. मार्च २०२१ नंतर तो इंग्लंडसाठी फक्त ७ सामने खेळला आहे. याशिवाय त्याने IPL २०२३ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी ५ सामने खेळले होते.

इंग्लंड क्रिकेट संघाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की पुढे म्हणाले की, "जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीत आता जबरदस्त लय दिसून येत आहे. सध्या तो कॅरिबियन बेटावर आहे. T20 विश्वचषक स्पर्धेत जोफ्रा आर्चर खेळण्याची पूर्ण शक्यता आहे".

याशिवाय जोफ्रा आर्चर पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत खेळू शकेल, अशी आशा रॉब कीने व्यक्त केली, मात्र सध्या तरी निश्चितपणे सांगणे कठीण आहे. 

जोफ्रा आर्चरचे क्रिकेट करिअर

जोफ्रा आर्चरच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्याने १३ कसोटी सामन्यांव्यतिरिक्त २१ वनडे आणि १५ टी-20 सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय त्याने आयपीएलचे ४० सामने खेळले आहेत. मुंबई इंडियन्सशिवाय जोफ्रा आर्चरने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले आहे.

Whats_app_banner