Cricket Record : इंग्लंडच्या कसोटीत ५ लाख धावा पूर्ण, टीम इंडियाच्या किती धावा? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Cricket Record : इंग्लंडच्या कसोटीत ५ लाख धावा पूर्ण, टीम इंडियाच्या किती धावा? जाणून घ्या

Cricket Record : इंग्लंडच्या कसोटीत ५ लाख धावा पूर्ण, टीम इंडियाच्या किती धावा? जाणून घ्या

Dec 07, 2024 09:33 PM IST

England Cricket Team 5 Lakh Test Runs : इंग्लंड क्रिकेट संघ ५ लाख कसोटी धावा करणारा पहिला संघ ठरला आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीदरम्यान हा चमत्कार घडला.

Cricket Record : इंग्लंडच्या कसोटीत ५ लाख धावा पूर्ण, टीम इंडियाच्या किती धावा? जाणून घ्या
Cricket Record : इंग्लंडच्या कसोटीत ५ लाख धावा पूर्ण, टीम इंडियाच्या किती धावा? जाणून घ्या (AP)

इंग्लंड क्रिकेट संघाने '५ लाख' कसोटी धावा करून इतिहास रचला आहे. सध्या इंग्लिश संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघात मालिकेतील दुसरी कसोटी खेळली जात आहे.

या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने हाफ मिलियन्स म्हणजेच पाच लाख कसोटी धावा पूर्ण केल्या. कसोटीत ५ लाख धावा करणारा इंग्लंड पहिला संघ ठरला आहे.

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी वेलिंग्टनमध्ये खेळली जात आहे. या सामन्यात इंग्लंड दुसऱ्या डावात फलंदाजी करत आहे. दरम्यान, इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या वतीने सोशल मीडियावर माहिती शेअर करताना म्हटले आहे की, इंग्लंड ५ लाख कसोटी धावा करणारा पहिला संघ ठरला आहे, हे आश्चर्यकारक आहे. म्हणजेच आजपर्यंत म्हणजेच सुमारे १४७ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात केवळ इंग्लंडनेच असा चमत्कार केला आहे.

१८९०० डावात इंग्लंडच्या ५ लाख धावा

इंग्लंडने आपल्या १४७ वर्षांच्या इतिहासात १०८२ कसोटी खेळून हा आकडा गाठला. ७१७ क्रिकेटपटूंनी इंग्लिश संघाला हा आकडा गाठण्यास मदत केली. या काळात इंग्लंडने १८९०० डावात फलंदाजी केली. कसोटीत सर्वाधिक ९२९ शतकांचा विक्रमही इंग्लंडच्या नावावर आहे.

सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्यांच्या यादीत ऑस्ट्रेलिया इंग्लंडनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने ४२८००० धावा केल्या आहेत. त्यानंतर टीम इंडिया २७८७५१ धावांसह यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाने ५८६ कसोटीत या धावा केल्या आहेत.

कसोटीत सर्वाधिक धावा (संघांनुसार)

इंग्लंड- ५००१२६ धावा

ऑस्ट्रेलिया- ४२८००० धावा

भारत- २७८७५१ धावा.

इंग्लंडसाठी जो रूट हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. रुटने आतापर्यंत १५१ सामन्यांच्या २७६ डावांमध्ये ५१ च्या सरासरीने १२८५३ धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून ३५ शतके आणि ६५ अर्धशतके झाली आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या