मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  USA vs ENG Highlights : आधी जॉर्डनची हॅटट्रिक, मग बटलरने एका षटकात ५ षटकार ठोकले; अमेरिकेचा १० विकेट्सनी धुव्वा

USA vs ENG Highlights : आधी जॉर्डनची हॅटट्रिक, मग बटलरने एका षटकात ५ षटकार ठोकले; अमेरिकेचा १० विकेट्सनी धुव्वा

Jun 23, 2024 10:41 PM IST

USA vs ENG Highlights : टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या सुपर ८ सामन्यात इंग्लंडने अमेरिकेचा १० गडी राखून पराभव केला आहे. इंग्लंडने हा सामना ६२ चेंडू शिल्लक असताना जिंकला. या सामन्यात जॉस बटलरने एकाच षटकात ५ षटकार ठोकले.

USA vs ENG Highlights : आधी जॉर्डनची हॅटट्रिक, मग बटलरने एका षटकात ५ षटकार ठोकले; अमेरिकेचा १० विकेट्सनी धुव्वा
USA vs ENG Highlights : आधी जॉर्डनची हॅटट्रिक, मग बटलरने एका षटकात ५ षटकार ठोकले; अमेरिकेचा १० विकेट्सनी धुव्वा (AP)

America Vs England Scorecard : टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या सुपर ८ सामन्यात इंग्लंडने अमेरिकेचा १० गडी राखून पराभव केला. जोस बटलर आणि फिलिप सॉल्टची सलामीची भागीदारी अमेरिकेच्या गोलंदाजांना तोडता आली नाही. कर्णधार बटलरने ३८ चेंडूत ८३ धावांची जलद खेळी करत इंग्लंडच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

बार्बाडोसच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने १८.५ षटकांत ११५ धावा केल्या, प्रत्युत्तरात इंग्लंडने केवळ ९.४ षटकांत बिनबाद ११७ धावा करून सामना जिंकला आणि उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरला. 

इंग्लंडकडून बटलरने ३८ चेंडूंत ६ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ८३ धावा केल्या तर फिल सॉल्टने २१ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने २५ धावा केल्या.

ट्रेंडिंग न्यूज

ख्रिस जॉर्डनची हॅट्ट्रिक

त्याआधी इंग्लंडने अमेरिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली. त्यामुळे अमेरिकेन संघाच्या ७ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. 

शेवटचे ४ फलंदाज तर शुन्यावर बाद झाले. अमेरिकेकडून नितीश कुमारने ३० धावांचे योगदान दिले तर कोरी अँडरसनने २९ धावांचे योगदान दिले. अमेरिकेन खेळाडूंमध्ये कोणतीही मोठी भागीदारी होऊ शकली नाही, ज्यामुळे यूएसएला केवळ ११५ धावा करता आल्या. 

होमग्राऊंडवर ख्रिस जॉर्डनने रचला इतिहास

ख्रिस जॉर्डन हा T20 मध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिला इंग्लंडचा गोलंदाज ठरला. त्याने १९व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अली खानला बोल्ड केले. पुढच्याच चेंडूवर अमेरिकेचा फिरकी गोलंदाज नोस्टुश केन्झिगे एलबीडब्ल्यू झाला. त्याने डीआरएस घेतला पण तो निर्णयात बदल होऊ शकला नाही. त्यानंतर जॉर्डनने सौरभ नेत्रावलकरला क्लीन बोल्ड करत ​​हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने स्फोटक फलंदाज कोरी अँडरसनलाही बाद केले होते.

बटलर-सॉल्टची जबरदस्त फलंदाजी

११६  धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला जोस बटलर आणि फिलिप सॉल्टने शानदार सुरुवात करून दिली. गतविजेत्या संघाच्या फलंदाजांनी तिसऱ्या षटकापासून वेग पकडण्यास सुरुवात केली आणि पॉवरप्ले षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या ६० धावांपर्यंत पोहोचली. 

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने ३२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि या सामन्यात स्फोटक शैलीत फलंदाजी करत ३६ चेंडूत ७८ धावा केल्या. दरम्यान, हरमीत सिंगच्या एकाच षटकात त्याने ५ षटकार ठोकले. हरमीतच्या षटकात एकूण ३२ धावा आल्या. 

WhatsApp channel