इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जात आहे. आज (२९ सप्टेंबर) या मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना ब्रिस्टल येथे खेळला जात आहे. मालिकेत दोन्ही संघ २-२ अशा बरोबरीत आहेत.
दरम्यान, या सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट याने झंझावाती शतक झळकावले. डकेटने अवघ्या ८६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. डकेटचे वनडे कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे.
मात्र, शतक झळकावल्यानंतर डकेट १०७ धावा करून जोश हेझलवूडचा बळी ठरला. त्याने आपल्या खेळीत १३ चौकार आणि २ षटकार मारले.
या संपूर्ण मालिकेत बेन डकेट उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. पाचव्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावण्याबरोबरच त्याने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ९३ धावांची आणि चौथ्या एकदिवसीय सामन्यात ६३ धावांची अप्रतिम खेळी खेळली होती. कसोटी फॉरमॅटनंतर डकेट आता वनडेतही स्वत:ला सिद्ध करत आहे.
अलीकडेच IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी रिटेन्शन पॉलिसी उघड झाली आहे. मेगा लिलावाबाबत सध्या बाजार तापला आहे. विशेष म्हणजे, सर्वच फ्रँचायझींनी आधीच त्यांच्या आवडत्या खेळाडूंना टार्गेट करणे सुरू केले आहे. आता लिलावादरम्यान त्यांना कोणावर बोली लावायची याची प्लॅनिंग सुरू असेल.
अशा परिस्थितीत बेन डकेटच्या या उत्कृष्ट कामगिरीकडे सर्वांच्या नजरा नक्कीच असतील. लिलावात बेन डकेटचे निश्चितच महागडा ठरू शकतो.
जर आपण बेन डकेटच्या T20 कारकिर्दीबद्दल बोललो तर, या डावखुऱ्या फलंदाजाने २०१९ मध्ये इंग्लंडकडून टी-20 मध्ये पदार्पण केले. त्याने एकूण १२ सामने खेळले आहेत. या काळात डकेटने १४५ च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने फलंदाजी करत ३१५ धावा केल्या आणि १ अर्धशतकही केले. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याच्या बॅटमधून ४० चौकार आणि २ षटकारही आले आहेत.