मोईन अली-बेअरस्टो यांची हकालपट्टी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, ५ नव्या खेळाडूंना संधी-england announced t20 and odi squad for australia series moeen ali and jonny bairstow out 5 debutant ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  मोईन अली-बेअरस्टो यांची हकालपट्टी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, ५ नव्या खेळाडूंना संधी

मोईन अली-बेअरस्टो यांची हकालपट्टी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, ५ नव्या खेळाडूंना संधी

Aug 27, 2024 12:08 PM IST

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी अत्यंत आश्चर्यकारक संघ जाहीर केले, ज्यामध्ये ५ नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली.

मोईन अली-बेअरस्टो यांची हकालपट्टी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, ५ नव्या खेळाडूंना संधी
मोईन अली-बेअरस्टो यांची हकालपट्टी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, ५ नव्या खेळाडूंना संधी

इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या ३ टी-20 सामन्यांच्या आणि ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. इंग्लंडने टी-20 मालिकेसाठी संघात ५ नवीन खेळाडूंची निवड केली आहे. त्याचबरोबर तीन मोठ्या खेळाडूंना दोन्ही मालिकांसाठी संघात स्थान मिळालेले नाही.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ११ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर दरम्यान ही क्रिकेट मालिका खेळवली जाईल. या दोन्ही मालिकेसाठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. तथापि, इंग्लंडने अतिशय आश्चर्यकारक संघ निवडले आहेत, ज्यामध्ये जॉनी बेअरस्टो आणि मोईन अलीसह अनेक स्टार्स गायब आहेत. टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडमधून ५ अनकॅप्ड खेळाडूंची निवड करण्यात आली.

या पाच अनकॅप्ड खेळाडूंना स्थान मिळाले

इंग्लंडने काही स्टार खेळाडूंना वगळून ५ अनकॅप्ड खेळाडूंचा संघात समावेश केला. या ५ खेळाडूंमध्ये फलंदाजी अष्टपैलू जेकब बेथेल, डॅन मौसली, फलंदाज जॉर्डन कॉक्स, गोलंदाज जॉन टर्नर आणि जोश हल यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जोश हल, जेकब बेथेल आणि जॉन टर्नर हे एकदिवसीय संघाचादेखील भाग आहेत.

इंग्लंड सध्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचे यजमानपद भूषवत आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लिश संघाने बाजी मारली आहे. ही कसोटी मालिका १० सप्टेंबर रोजी संपेल आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका दुसऱ्या दिवशी म्हणजेच ११ सप्टेंबरपासून सुरू होईल.

बेअरस्टो आणि मोईन अली यांचे करिअर संपले?

जॉनी बेअरस्टो आणि मोईन अली या खेळाडूंचे वाढते वय आता त्यांच्यासाठी समस्या बनत चालली आहे. वाढत्या वयामुळे हे खेळाडू संघातील स्थान गमावताना दिसत आहेत. बेअरस्टो आणि मोईन अली यांच्याशिवाय वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनलाही संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. मात्र, या खेळाडूंना संघात स्थान का मिळाले नाही, हे इंग्लंडकडून स्पष्ट करण्यात आले नाही.

इंग्लंडचा टी-20 संघ

जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, सॅम कुरन, जोश हल, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, साकिब महमूद, डॅन मुसली, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोपली, जॉन टर्नर.

इंग्लंडचा एकदिवसीय संघ

जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जोश हल, विल जॅक्स, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जेमी स्मिथ, रीस टोपली, जॉन टर्नर.