मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  ENG Vs SA : इंग्लंडने आफ्रिकेला १६३ धावांवर रोखलं, शेवटच्या षटकांमध्ये आर्चर-रशीदची दमदार गोलंदाजी

ENG Vs SA : इंग्लंडने आफ्रिकेला १६३ धावांवर रोखलं, शेवटच्या षटकांमध्ये आर्चर-रशीदची दमदार गोलंदाजी

Jun 21, 2024 09:43 PM IST

ENG Vs SA T20 Scorecard : टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये आज इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी क्रिकेट स्टेडिमयवर खेळला जात आहे.

ENG Vs SA T20 Scorecard T20 World Cup 2024
ENG Vs SA T20 Scorecard T20 World Cup 2024 (PTI)

England Vs South Africa Super 8 : टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या सुपर ८ सामन्यात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी क्रिकेट स्टेडिमयवर इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १६३ धावा केल्या. इंग्लंडला विजयासाठी १६४ धावा करायच्या आहेत.

आफ्रिकेकडून सलामीवीर क्विंटन डी कॉकचे अर्धशतक ठोकले. तर शेवटी डेव्हिड मिलरने २८ चेंडूत ४३ धावांच्या खेळी केली. या दोघांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने १६३ धावांपर्यंत मजल मारली. 

बॅटिंग पीचवर प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर क्विंटन डी कॉकने दक्षिण आफ्रिकेला स्फोटक सुरुवात करून दिली. एकवेळ धावसंख्या बिनबाद ८६ धावा होती. अशा स्थितीत आफ्रिकन संघ २०० चा पल्ला सहज पार करेल असे वाटत होते, पण मधल्या फळीतील फ्लॉप शोमुळे मोठी धावसंख्या उभारता आली नाही. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक ३ बळी घेतले.

ट्रेंडिंग न्यूज

दक्षिण आफ्रिकेसाठी क्विंटन डी कॉकने केवळ ३८ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून ४ चौकार आणि ४ षटकार आले. अखेरीस, डेव्हिड मिलरने २८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने महत्त्वपूर्ण ४३ धावा केल्या. या दोघांशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला इंग्लिश गोलंदाजांचा सामना करता आला नाही. रीझा हेंड्रिक्स २५ चेंडूत १९ धावा, हेनरिक क्लासेन १३ चेंडूत ८ धावा आणि एडन मार्कराम २ चेंडूत १ धावा काढून बाद झाले.

क्विंटन डीकॉक बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने ठराविक अंतराने विकेट गमावल्या, परंतु मिलरने दुसऱ्या टोकाकडून डाव सावरला आणि संघाची धावसंख्या १६० धावांच्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

WhatsApp channel