Emerging Asia Cup : तिलक वर्मा कर्णधार, भारत-पाकिस्तान सामन्यानं होणार इमर्जिंग आशिया कपची सुरुवात, तारीख पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Emerging Asia Cup : तिलक वर्मा कर्णधार, भारत-पाकिस्तान सामन्यानं होणार इमर्जिंग आशिया कपची सुरुवात, तारीख पाहा

Emerging Asia Cup : तिलक वर्मा कर्णधार, भारत-पाकिस्तान सामन्यानं होणार इमर्जिंग आशिया कपची सुरुवात, तारीख पाहा

Published Oct 14, 2024 02:03 PM IST

Emerging Asia Cup 2024 Schedule : उदयोन्मुख आशिया चषक २०२४ मध्ये भारत-अ संघात प्रथमच नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत. ही स्पर्धा १८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, तर शेवटचा सामना २७ ऑक्टोबरला होणार आहे.

Emerging Asia Cup : तिलक वर्मा कर्णधार, भारत-पाकिस्तान सामन्यानं होणार इमर्जिंग आशिया कपची सुरुवात, तारीख पाहा
Emerging Asia Cup : तिलक वर्मा कर्णधार, भारत-पाकिस्तान सामन्यानं होणार इमर्जिंग आशिया कपची सुरुवात, तारीख पाहा (PTI)

BCCI ने इमर्जिंग एशिया कप २०२४ साठी भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. तिलक वर्माला भारत अ संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याच्याशिवाय या स्पर्धेसाठी मंडळाने अनेक युवा खेळाडूंनाही संधी दिली आहे.

उदयोन्मुख आशिया चषक २०२४ मध्ये भारत-अ संघात प्रथमच नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत. ही स्पर्धा १८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, तर शेवटचा सामना २७ ऑक्टोबरला होणार आहे.

या स्पर्धेत भारतासोबतच ८ संघ सहभागी होणार असून त्यात पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, हाँगकाँग, UAE आणि ओमान या संघांचा समावेश आहे.

तिलक वर्मा भारत अ संघाचा कर्णधार 

वास्तविक, पुरुष निवड समितीने भारत-अ संघाची निवड केली आहे. इमर्जिंग आशिया चषक २०२४  साठी तिलक वर्माला भारत-अ संघाचे कर्णधार बनवण्यात आले आहे. ही स्पर्धा 18 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, जी २७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत खेळवली जाईल.

भारत पाक सामना १९ ऑक्टोबरला

ओमान, यूएई, पाकिस्तान अ आणि भारत अ संघाला ब गटात ठेवण्यात आले आहे, तर अफगाणिस्तान अ, बांगलादेश अ, श्रीलंका अ आणि हाँगकाँग या संघांना अ गटात ठेवण्यात आले आहे. भारत-अ संघ पाकिस्तान-अ संघाविरुद्ध सामना खेळून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

या दोन संघांमधील स्पर्धेतील सलामीचा सामना १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा सामना ओमान क्रिकेट अकादमीच्या मैदानावर होणार आहे.

इमर्जिंग आशिया कप २०२४ चे वेळापत्रक

१९ ऑक्टोबर - भारत-अ विरुद्ध पाकिस्तान-अ, ओमान क्रिकेट मैदान

२१ ऑक्टोबर – भारत अ विरुद्ध UAE – ओमान क्रिकेट अकादमी मैदान

२३ ऑक्टोबर – ओमान विरुद्ध भारत अ, ओमान क्रिकेट अकादमी मैदान

२५ ऑक्टोबर – पहिली सेमी फायनल 

२५ ऑक्टोबर - दुसरी सेमी फायनल

२७ ऑक्टोबर - फायनल

उदयोन्मुख आशिया कपसाठी भारत अ संघ - तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा (उपकर्णधार), प्रभसिमरन सिंग, आयुष बडोनी, निशांत सिंधू, रमणदीप सिंग, वैभव अरोरा, रसिक सलाम, अनुज रावत, नेहल वढेरा, अंशुल कंबोज, हृतिक शौकीन, साई किशोर, राहुल चहर आणि आकिब खान.  

Whats_app_banner

संबंधित बातम्या