WPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची स्टार अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीने मंगळवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या वूमन प्रीमियर लीग सामन्यात चमकदार गोलंदाजी करत रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले. नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पेरीने शानदार खेळी करत मुंबईची फलंदाजाच्या नाकी नऊ आणले. एलिस पेरीने या सामन्यात सहा विकेट्स घेतले. डब्लूपीएलमध्ये एखाद्या गोलंदाजाने सहा विकेट्स घेण्याची पहिलीच वेळ आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर डब्लूपीएलचा १९वा सामना खेळला जातोय. या सामन्यात बंगळुरूच्या पेरीने चार षटकांत १६ धावा खर्च करून सहा विकेट्स घेतल्या. डब्लूपीएलमध्ये अशी कामगिरी करणारी ती पहिलीच गोलंदाज ठरली आहे. डब्लूपीएलमध्ये आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला एका सामन्यात ६ विकेट्स घेता आले नाही.
मुंबईच्या डावातील ९ व्या षटकात एस सजना तिचा पहिला विकेट ठरली आणि त्यानंतर तिच्यासाठी काहीच थांबले नाही. आरसीबीकडून तिने सलग सहा विकेट्स घेतल्या. दुसऱ्या क्रमांकापासून सातव्या क्रमांकापर्यंत मुंबईचे सर्व फलंदाज पेरीचे विकट ठरले.
डब्लूपीएलच्या एका सामन्यात ६ विकेट घेणारी एलिस पेरी पहिली खेळाडू ठरली. हेली मॅथ्यूजच्या पहिल्या विकेटमध्ये पेरीचाही समावेश होता. कारण तिने स्क्वेअर लेगवर उत्कृष्ट कॅच घेत विंडीज स्टारचा मधल्या फळीतील मुक्काम संपुष्टात आणला. पेरीने हरमनप्रीत कौर, एस साजना, अमनजोत कौर आणि पूजा वस्त्राकर यांच्या बोल्ड आऊट केले. मुंबईला तिच्या रोषातून सावरण्यात अपयश आले आणि ती १९ षटकांत केवळ ११३ धावांवर आटोपली. तिने ९व्या, ११व्या आणि १३व्या षटकात प्रत्येकी दोन विकेट्स घेत महिला टी-२० क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजी केली.
संबंधित बातम्या