Dwayne Bravo : डुप्लेसिसचं भाषण ऐकून ड्वेन ब्राव्हो लहान मुलासारखं रडला, CPL संपण्याआधीच क्रिकेट सोडलं!-dwayne bravo started crying like a child after hearing faf duplessis speech became emotional after retiring from cpl ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Dwayne Bravo : डुप्लेसिसचं भाषण ऐकून ड्वेन ब्राव्हो लहान मुलासारखं रडला, CPL संपण्याआधीच क्रिकेट सोडलं!

Dwayne Bravo : डुप्लेसिसचं भाषण ऐकून ड्वेन ब्राव्हो लहान मुलासारखं रडला, CPL संपण्याआधीच क्रिकेट सोडलं!

Sep 27, 2024 11:57 AM IST

Dwayne Bravo retirement : ब्राव्होने सीपीएलनंतर व्यावसायिक क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेणार असल्याचे आधीच जाहीर केले होते, परंतु दुखापतीमुळे त्याला प्लेऑफपूर्वी निवृत्ती घ्यावी लागली.

Dwayne Bravo retirement :  डुप्लेसिसचं भाषण ऐकून ड्वेन ब्राव्हो लहान मुलासारखं रडला, दुखापीतमुळे CPL संपण्याआधीच क्रिकेट सोडलं
Dwayne Bravo retirement : डुप्लेसिसचं भाषण ऐकून ड्वेन ब्राव्हो लहान मुलासारखं रडला, दुखापीतमुळे CPL संपण्याआधीच क्रिकेट सोडलं

वेस्ट इंडिजचा अनुभवी क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो याने दुखापतीमुळे स्पर्धा संपण्यापूर्वी कॅरेबियन प्रीमियर लीगमधून निवृत्ती घेतली आहे. CPL 2024 मध्ये ब्राव्हो आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना त्रिनबागो नाइट रायडर्सकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.

ब्राव्होने सीपीएलनंतर व्यावसायिक क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेणार असल्याचे आधीच जाहीर केले होते, परंतु दुखापतीमुळे त्याला प्लेऑफपूर्वी निवृत्ती घ्यावी लागली.

आपल्या करिअरचा शेवटचा सामना खेळल्यानंतर ब्राव्हो खूप भावूक झाला. संघाच्या खेळाडूंनी त्याला गार्ड ऑफ ऑनरही दिला. विरोधी संघ सेंट लुसियाचा कर्णधार फाफ डुप्लेसिस याचे भाषण ऐकताना ब्राव्हो स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू तरळले.

क्षेत्ररक्षण करताना ब्राव्होला दुखापत झाली होती, यामुळे त्याला स्पर्धा संपण्यापूर्वी शेवटचा सामना खेळावा लागला.

ब्राव्होच्या नावावर CPL ची पाच जेतेपदं

ड्वेन ब्राव्हो हा जगातील महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. ब्राव्होने सीपीएलमध्येही भरपूर यश मिळवले आहे. या लीगमधील ५ विजेतेपदांमध्ये त्याचा सहभाग आहे. या दरम्यान, त्याने दीर्घकाळ TKR चे नेतृत्व देखील केले आहे. ब्राव्होने फार पूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती, मात्र तो टी-20 लीग क्रिकेटमध्ये खेळत होता.

ड्वेन ब्राव्होचे क्रिकेट करिअर

ड्वेन ब्राव्होने वेस्ट इंडिजसाठी ४० कसोटी, १६४ एकदिवसीय आणि ९१ टी-20 सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये २२०० धावा आणि त्याने ८६ विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत.

याशिवाय ब्राव्होच्या नावावर वनडे फॉरमॅटमध्ये २९६८ धावांसह १९९ विकेट आहेत. T20 इंटरनॅशनलमध्ये ब्राव्होने १२५५ धावा केल्या आणि ७८ विकेट्सही घेतल्या.

सीपीएलबद्दल बोलायचे झाले तर ब्रावो या लीगमध्ये एकूण १०६ सामन्यांमध्ये दिसला. सीपीएलमध्ये ब्राव्होने ११५५ धावा केल्या आहेत आणि १२९ विकेट्सही घेतल्या आहेत.

Whats_app_banner
विभाग