दुलीप ट्रॉफी २०२४ मध्ये भारत-सी आणि इंडिया-बी यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (१४ सप्टेंबर) वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज याने ५ बळी घेतले.
विशेष म्हणजे तिसऱ्या दिवशी सकाळी पडलेल्या सर्व विकेट अंशुलच्या नावावर होत्या. अंशुलच्या या शानदार कामगिरीच्या जोरावर भारत-सी संघाने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे.
हरियाणात जन्मलेल्या या अष्टपैलू खेळाडूने तिसऱ्या दिवशी भारत-ब संघाची फलंदाजी उखडून टाकली. यासह अंशुल कंबोजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ५ विकेट घेण्याचा पराक्रम केला.
इंडिया-बी ने तिसऱ्या दिवसाची सुरुवात बिनबाद १२३ धावांवरून केली, भारत-ब संघाचा कर्णधार कर्णधार अभिमन्यू ईश्वरन आणि एन. जगदीशनने सपाट खेळपट्टीवर काही चांगले शॉट्स खेळले.
पण यानंतर अंशुलने दुलीप ट्रॉफीत पदार्पण करणाऱ्या जगदीशनला वैयक्तिक ७० धावांवर बाद करून संघाला मोठे यश मिळवून दिले आणि १२९ धावांची भागीदारी मोडली.
यानंतर अंशुलने मुशीर खानची विकेट घेत संघाला पुनरागमनाची संधी दिली. मुशीनरने १ धाव केली यानंतर सरफराज खान १६ धावा करून अंशुलचा तिसरा बळी ठरला.
रिंकू सिंहही ४ धावा करून बाद झाला. रिंकूच्या रूपाने इंडिया-सीला चौथी विकेट मिळाली. यानंतर अंशुल कंबोजने नितीश कुमारला क्लीन बोल्ड पाचवी विकेट मिळवली.
या वेगवान गोलंदाजाने मुशीर खान, सरफराज खान, रिंकू सिंग, नितीश रेड्डी आणि नारायण जगदीसन यांच्यासह अव्वल ५ फलंदाजांना बाद केले. अंशुलने आपल्या अचूक लाईन लेन्थ आणि वेगाने फलंदाजांना चकित केले आणि संघाला सामन्यात परत आणले.
२३ वर्षीय अंशुल कंबोजने १४ देशांतर्गत सामने खेळले असून ३८.१४ च्या सरासरीने २७ बळी घेतले आहेत. अंशुलने २०२२ मध्ये त्रिपुरा विरुद्ध हरियाणाकडून प्रथम श्रेणी पदार्पण केले आणि IPL २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला करारबद्ध केले. त्याने SRH विरुद्ध मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण केले आणि पहिल्याचा सामन्यात मयंक अग्रवालला बाद केले.