जडेजा आणि सिराज या महत्वाच्या मालिकेतून बाहेर, या खेळाडूंना मिळाली सुवर्णसंधी-duleep trophy 2024 indisposed mohammed siraj ruled out ravindra jadeja allowed more rest ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  जडेजा आणि सिराज या महत्वाच्या मालिकेतून बाहेर, या खेळाडूंना मिळाली सुवर्णसंधी

जडेजा आणि सिराज या महत्वाच्या मालिकेतून बाहेर, या खेळाडूंना मिळाली सुवर्णसंधी

Aug 27, 2024 03:14 PM IST

मोहम्मद सिराजच्या जागी नवदीप सैनीचा समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद सिराज टीम-बीचा भाग होता. याशिवाय अष्टपैलू रवींद्र जडेजाही खेळू शकणार नाही. रवींद्र जडेजा टी-बीचा भाग होता.

Duleep Trophy 2024 : जडेजा आणि सिराज या महत्वाच्या मालिकेतून बाहेर, या खेळाडूंना मिळाली सुवर्णसंधी
Duleep Trophy 2024 : जडेजा आणि सिराज या महत्वाच्या मालिकेतून बाहेर, या खेळाडूंना मिळाली सुवर्णसंधी

दुलीप ट्रॉफी २०२४ ही स्पर्धा ५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पण याआधी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक स्पर्धेतून बाहेर आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबाबत माहिती दिली आहे. जडेजा टीम बीकडून खेळणार होता. मात्र त्याला रीलीज करण्यात आले आहे. सिराज आणि उमरान आजारपणामुळे खेळू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या जागी नवदीप सैनी आणि गौरव यादव यांना संधी देण्यात आली आहे.

वेगवान गोलंदाज सिराजचा बी टीममध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र आता आजारपणामुळे तो खेळू शकणार नाही. ब टीममध्ये सिराजच्या जागी नवदीप सैनीला संधी देण्यात आली आहे. नवदीप हा अनुभवी गोलंदाज असून त्याने अनेक प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे.

अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखाली नवदीप टीम बी मध्ये खेळणार आहे. नवदीपच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकली तर तो भारतासाठी ८ वनडे सामने खेळला आहे. त्याने २ कसोटी आणि ११ टी-20 सामनेही खेळले आहेत. त्याने लिस्ट ए मध्ये १०१ तर फर्स्ट क्लासमध्ये १८४ विकेट्स घेतल्या आहेत.

उमरानच्या जागी गौरव यादवला टीम सी मध्ये

उमरान मलिकबद्दल बोलायचे झाले तर तो ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली टीम सी चा भाग होता. उमरानही आजारी आहे. त्यामुळे तो खेळू शकणार नाही. उमरानच्या जागी गौरव यादवला टीम सी मध्ये स्थान मिळाले आहे.

गौरवने ३७ प्रथम श्रेणी सामन्यात १४१ बळी घेतले आहेत. त्याने २३ लिस्ट ए सामन्यात ४८ विकेट घेतल्या आहेत. गौरव आता सूर्यकुमार यादव आणि गायकवाड यांसारख्या दिग्गज खेळाडूंसोबत खेळणार आहे.

दुलीप ट्रॉफी २०२४ चे अपडेटेड संघ -

भारत बी संघ: अभिमन्यू इसवरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी*, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी , एन. जगदीसन.

भारत सी संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीत, हृतिक शोकीन, मानव सुथार, गौरव यादव, विशाक विजयकुमार, अंशुल खांबोज, हिमांशू चौहान, मयंक मार्कंडे, आर्यन जुयाल, संदीप वारियर.