Duleep Trophy : उद्यापासून रंगणार क्रिकेटचा थरार, सामन्याची वेळ, लाईव्ह स्ट्रिमिंग, A टू Z माहिती जाणून घ्या-duleep trophy 2024 all team squad schedule match timing where can you watch duleep trophy matches ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Duleep Trophy : उद्यापासून रंगणार क्रिकेटचा थरार, सामन्याची वेळ, लाईव्ह स्ट्रिमिंग, A टू Z माहिती जाणून घ्या

Duleep Trophy : उद्यापासून रंगणार क्रिकेटचा थरार, सामन्याची वेळ, लाईव्ह स्ट्रिमिंग, A टू Z माहिती जाणून घ्या

Sep 04, 2024 05:36 PM IST

या स्पर्धेत काही बडे खेळाडू सोडले तर संपूर्ण टीम इंडिया खेळणार आहे. दुलीप ट्रॉफीचा पहिला सामना ५ सप्टेंबरला होणार आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक, यात खेळणाऱ्या ४ संघांची माहिती आपण येथे जाणून घेणार आहोत.

Duleep Trophy 2024 Live Streaming and Telecast : उद्यापासून रंगणार क्रिकेटचा थरार, सामन्याची वेळ, लाईव्ह स्ट्रिमिंग, A टू Z माहिती जाणून घ्या
Duleep Trophy 2024 Live Streaming and Telecast : उद्यापासून रंगणार क्रिकेटचा थरार, सामन्याची वेळ, लाईव्ह स्ट्रिमिंग, A टू Z माहिती जाणून घ्या

भारतीय संघातील स्टार खेळाडू पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. सध्या टीम इंडियाचा कोणताही आंतरराष्ट्रीय सामना नाही. पण उद्यापासून गुरुवार (५ सप्टेंबर) दुलीप ट्रॉफी सुरू होणार आहे. सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजेपासून सुरू होतील.

या स्पर्धेत काही बडे खेळाडू सोडले तर संपूर्ण टीम इंडिया खेळणार आहे. दुलीप ट्रॉफीचा पहिला सामना ५ सप्टेंबरला होणार आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक, यात खेळणाऱ्या ४ संघांची माहिती आपण येथे जाणून घेणार आहोत.

दुलीप ट्रॉफीत ४ संघ सहभागी होत आहेत

दुलीप करंडक स्पर्धेत एकूण ४ संघ सहभागी होत आहेत. यामध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. संघांची ए, बी, सी आणि डी अशी विभागणी करण्यात आली आहे.

अ संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे आहे. तर बी संघाचे नेतृत्व अभिमन्यू इसवरन करणार आहे. तसेच, सी संघाची कमान ऋतुराज गायकवाड याच्याकडे आहे. यानंतर टीम डीचा कर्णधार श्रेयस अय्यर आहे.

भारताचे सर्व खेळाडू या ४ संघांमध्ये विभागले जातील. यावेळी वरिष्ठ खेळाडूही त्यात सहभागी होणार असल्याने नवीन आणि युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता थोडी कमी आहे.

पहिला सामना भारत अ आणि भारत ब यांच्यात

दुलीप ट्रॉफी २०२४ चा पहिला सामना भारत अ आणि भारत ब यांच्यात ५ सप्टेंबरपासून होणार आहे. त्याच दिवशी भारत क आणि भारत ड संघ देखील आमनेसामने येतील.

यानंतर १२ सप्टेंबरला भारत अ आणि ड तसेच भारत ब आणि क संघ आमनेसामने येतील.

१९ सप्टेंबरला भारत ब आणि भारत ड संघ एकमेकांना भिडतील, तर त्याच दिवशी भारत अ आणि भारत क संघदेखील आमनेसामने येतील.

म्हणजेच दुलीप ट्रॉफीत प्रत्येक संघाला ३ सामने खेळावे लागणार आहेत. हे सामने ४ दिवसीय असतील. भारत आणि बांगलादेश यांच्यातील मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, तोपर्यंत हे सामने संपतील.

दुलीप ट्रॉफीच्या सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे दिसणार?

जिओ सिनेमा ॲपवर क्रिकेटप्रेमी दुलीप ट्रॉफी २०२४ चे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात.

दुलीप ट्रॉफीच्या सामन्यांचे लाइव्ह टेलिकास्ट कुठे बघायचे?

दुलीप ट्रॉफी २०२४ च्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर पाहता येईल.

दुलीप ट्रॉफी २०२४ मधील संघ

टीम ए

शुभमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, केएल राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वत कवेरप्पा, कुमार कुशाग्रा , शास्वत रावत.

टीम बी

अभिमन्यू इसवरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदीसन.

संघ सी :

 ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), बी इंद्रजीत, हृतिक शौकीन, मानव सुथार, विशाक विजयकुमार, अंशुल खांबोज, हिमांशू चौहान, मयंक मार्कंडे, आर्यन जुयाल (डब्ल्यूके), संदीप वारकरी .

टीम डी :

 श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन (यष्टीरक्षक), रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भगत , सौरभ कुमार.

दुलीप ट्रॉफी २०२४ चे वेळापत्रक

५-८ सप्टेंबर: टीम ए विरुद्ध टीम बी

५-८ सप्टेंबर: टीम सी विरुद्ध टीम डी

१२-१५ सप्टेंबर: टीम ए विरुद्ध टीम डी

१२-१५ सप्टेंबर: टीम बी विरुद्ध टीम सी

१९-२२ सप्टेंबर: टीम बी विरुद्ध टीम डी

१९-२२ सप्टेंबर: टीम ए विरुद्ध टीम सी