Ayush Badoni : आयुष बदोनीनं मारले १९ षटकार, एकट्याने ठोकल्या १६५ धावा, संघाची धावसंख्या ३०० च्या पार
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ayush Badoni : आयुष बदोनीनं मारले १९ षटकार, एकट्याने ठोकल्या १६५ धावा, संघाची धावसंख्या ३०० च्या पार

Ayush Badoni : आयुष बदोनीनं मारले १९ षटकार, एकट्याने ठोकल्या १६५ धावा, संघाची धावसंख्या ३०० च्या पार

Published Aug 31, 2024 05:35 PM IST

Ayush Badoni : दक्षिण दिल्लीचा कर्णधार आयुष बदोनीने वादळी फलंदाजी करताना १९ षटकारांचा पाऊस पाडला. त्याने ३०० च्या स्ट्राईक रेटने १६५ धावा ठोकल्या.

Ayush Badoni : आयुष बदोनीनं मारले १९ षटकार, एकट्याने ठोकल्या १६५ धावा, संघाची धावसंख्या ३०० च्या पार
Ayush Badoni : आयुष बदोनीनं मारले १९ षटकार, एकट्याने ठोकल्या १६५ धावा, संघाची धावसंख्या ३०० च्या पार

दिल्ली प्रीमियर लीग २०२४ मध्ये आज शनिवारी (३१ ऑगस्ट) इतिहास घडला आहे. दक्षिण दिल्लीने उत्तर दिल्ली स्ट्रायकर्सच्या धुलाई करत २० षटकात ३०८ धावांचा पाऊस पाडला.

फ्रँचायझी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा हा विक्रम आहे. दक्षिण दिल्लीचा कर्णधार आयुष बडोनी याने ३०० च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या. त्याने ५५ चेंडूत १६५ धावांची खेळी केली. तो ख्रिस गेलच्या T20 क्रिकेटमधील १७५ च्या सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येपासून केवळ १० धावांनी मागे राहिला. प्रियांश आर्य यानेही १०२० धावा केल्या. यादरम्यान त्याने ६ चेंडूत सलग ६ षटकार ठोकण्याचा पराक्रमही केला.

आयुष बडोनीने १९ षटकार ठोकले

दक्षिण दिल्लीचा कर्णधार आयुष बदोनीने वादळी फलंदाजी करताना १९ षटकारांचा पाऊस पाडला. त्याने ३०० च्या स्ट्राईक रेटने १६५ धावा ठोकल्या. आयुष बडोनीने दक्षिण दिल्ली सुपरस्टारसाठी शानदार फलंदाजी केली आणि उत्तर दिल्ली स्ट्रायकर्सविरुद्ध केवळ ५५ चेंडूत ८ चौकार आणि १९ षटकार ठोकले.

आयुष बदोनीने टी-20 क्रिकेटमधील कोणत्याही फ्रेंचायझी लीगमध्ये भारतीय म्हणून सर्वात मोठी खेळी खेळली आहे. एकंदरीत पाहिल्यास, ख्रिस गेल (१७५* आरसीबी विरुद्ध पुणे वॉरियर्स) आणि ॲरॉन फिंच (१७२ ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वे) नंतर ही तिसरी सर्वोत्तम खेळी आहे.

दक्षिण दिल्लीने ३०८ धावा केल्या

आयुषसोबतच्या या सामन्यात सलामीवीर प्रियांश आर्यने ५० चेंडूत १० चौकार आणि १० षटकारांसह १२० धावा केल्या. या खेळीत त्याने एकाच षटकात ६ षटकारही मारले.

प्रियांशने डावातील १२व्या षटकात सलग ६ षटकार ठोकले. यावेळी उत्तर दिल्लीहून मनन भारद्वाज गोलंदाजीसाठी आला होता. त्याने खूप प्रयत्न केले, पण प्रियांशला थांबवता आले नाही. प्रियांशने युवराज सिंगप्रमाणे ६ षटकार ठोकले.

 

अशाप्रकारे दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सने निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावून ३०८ धावा केल्या. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये झाला. उत्तर दिल्लीचा एकही गोलंदाज धावांचा वेग रोखू शकला नाही. सिद्धार्थ सोलंकीने मात्र ३ बळी घेतले. त्याने ४ षटकात ५२ धावा दिल्या. प्रांशु विजयरनने ४ षटकात ३९ धावा देत २ बळी घेतले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या