युएईची टी-20 लीग आंतरराष्ट्रीय लीग टी-20 (ILT20) ही स्पर्धा लवकरच सुरू होणार आहे. ILT20 चा दुसरा सीझन १९ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या काळात खेळला जाणार आहे.
दरम्यान, ही स्पर्धा सुरू होण्याआधी एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून आयोजकांनी स्पर्धेतील हिंदी कॉमेंटेटर्सचे चेहरे समोर आणले आहेत. इंटरनॅशनल लीग टी-20 मध्ये कोण-कोणते माजी क्रिकेटर्स हिंदीत कॉमेंट्री करणार आहेत, यांची पहिली झलक दाखवण्यात आली आहे.
या व्हिडीओत भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग पाकिस्तानी क्रिकेटपटूंची मजा घेताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये वीरेंद्र सेहवागसोबत पाकिस्तानचे वेगवाग गोलंदाजी त्रिकूट वसीम अक्रम, शोएब अख्तर आणि वकार वुनुस हेदेखील दिसत आहेत. सेहवाग शोएब अख्तरसोबत विनोद करताना दिसत आहे. सोबतच, या व्हिडीओत हरभजन सिंगदेखील दिसतोय.
या व्हिडीओत सर्व गोलंदाज आहेत. सेहवाग हा एकटाच फलंदाज आहे. त्यामुळे तो म्हणतोय, या सर्वांना मी एकटाच पुरेसा आहे.
या ILT20 मध्ये अबू धाबी नाइट रायडर्स, डेझर्ट वायपर्स, दुबई कॅपिटल्स, गल्फ जायंट्स, एमआय एमिरेट्स आणि शारजाह वॉरियर्स असे ६ संघ सहभागी होत आहेत. तर डेव्हिड वॉर्नर, आंद्रे रसेल, किरॉन पोलार्ड, सॅम बिलिंग्ज आणि मार्टिन गप्टिल सारखे दिग्गज खेळाडू या लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत.
संबंधित बातम्या